घर विकून सुरू केला होता 'हा' व्यवसाय, आता कमवतायत महिन्याला 1 कोटी रुपये

घर विकून सुरू केला होता 'हा' व्यवसाय, आता कमवतायत महिन्याला 1 कोटी रुपये

शुभ्रा चड्डा आणि त्यांच्या पतींनी 40 लाख रुपयात आपलं घर विकून व्यवसाय सुरू केला.

  • Share this:

मुंबई, 16 मे : चुंबकची सह संस्थापक शुभ्रा चड्डानं व्यवसाय करायचा कधी विचारही केला नव्हता. बिझनेस करण्यासाठी त्यांच्याकडे आयडिया होती, पण चांगल्या पगाराची काॅर्पोरेट नोकरी सोडण्याची हिंमत नव्हती. पण 2008मध्ये आपल्या मुलीच्या जन्मानंतर त्यांनी ब्रेक घेतला. हीच वेळ होती व्यवसायाबद्दल विचार करण्याची. पण सहा महिन्यातच त्यांना व्यवसायात नुकसान झालं. तेही प्रचंड नुकसान. कठीण प्रसंगी त्यांच्या पतीनं त्यांना साथ दिली. आता चुंबक ब्रँडचे देशात 17 स्टोअर्स आणि ई काॅमर्स शाॅपिंग प्लॅटफाॅर्म आहेत. चुंबक ब्रँड तयार कपडे, बॅग्स, गिफ्ट्स, दागिने, होम डेकोर अशांसारखी  उत्पादनं विकते.

पुलवामामध्ये पुन्हा चकमक, भारतीय जवानांकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा

अशी झाली कंपनी सुरू

त्यांचं लक्ष्य असे ग्राहक होते जे सतत गिफ्ट्सच्या शोधात असतात. जे लोक नेहमी नावीन्याच्या शोधात असतात, त्यांच्यासाठी उत्पादनं बनवण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांनी जवळजवळ एक वर्ष ही संकल्पना, डिझाइन, सप्लायर, प्राइसिंग, रिटेल स्ट्रॅटेजी यावर काम केलं आणि चुंबकची सुरुवात झाली.

शुभ्रा चड्डा आणि त्यांच्या पतींनी 40 लाख रुपयात आपलं घर विकून व्यवसाय सुरू केला. ही मोठी रिस्क होती. म्हटलं तर जुगार होता. पण यश मिळालं. आता त्यांची तीन रुम्सचा फ्लॅट आहे. सुरुवातीचे सहा महिने कठीण गेले. कंपनी बुडायला लागली होती.

अजित पवारांच्या पराभवासाठी भाजपचं 'मिशन बारामती'

आज कमवतात कोट्यवधी - शुभ्रा यांनी 2010मध्ये बंगळुरू इथे आपलं पहिलं स्टोअर उघडलं. हे स्टोअर त्यांनी आपले पती विवेक प्रभाकर यांच्या बरोबर उघडलं. ते सन मायक्रोसिस्टममध्ये नोकरी करत होते. सुरुवातीला या व्यवसायात मॅग्नेट्स, की चेन आणि उशीची कव्हर्स होती. आता 100हून अधिक उत्पादनं त्यांच्याकडे आहेत. ते आपल्या वस्तू वेबसाइट आणि ई काॅमर्स प्लॅटफाॅर्मवरून विकतात. त्यांचे देशभरात 17 आउटलेट आहेत. वर्षाला त्यांची कमाई 12 कोटी आहे.

ट्विटरवरील EXIT POLL बाबतचे ट्वीट हटवा; निवडणूक आयोगाचे आदेश

ब्रँडवर केलं फोकस - शुभ्रा यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्याकडे दोन पर्याय होते. एक होता दुसऱ्या दुकानांत वस्तू विकायला द्यायच्या आणि नफा घ्यायचा. तर दुसरा पर्याय ब्रँडमध्ये गुंतवणूक करायची आणि आपली दुकानं उघडायची. त्यांनी लाँग टर्म फायद्यावर लक्ष केंद्रित केलं. शुभ्रा ब्रँडला आपला लाइफस्टाइल ब्रँड तयार करायचाय.

SPECIAL REPORT: पायघड्या, बँडबाजा, फुलांचा वर्षाव...चिमुकल्या नातीचं जंगी स्वागत

First published: May 16, 2019, 11:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading