Home /News /money /

2 मित्रांची Success Story! चिकनध्ये जीव ओतून सुरू केली Licious कंपनी, आहे अब्जावधींचा व्यवसाय

2 मित्रांची Success Story! चिकनध्ये जीव ओतून सुरू केली Licious कंपनी, आहे अब्जावधींचा व्यवसाय

तुमच्यापैकी अनेकांनी 'लिशियस' (Licious Business) नाव ऐकलं असेल किंवा त्याची एखादी जाहिरात तरी पाहिली असेल. नॉनव्हेज अर्थात मांसाहारी पदार्थांचे शौकिन असणाऱ्या लोकांमध्ये सध्या हे नाव चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. जाणून घ्या या कंपनीची Success Story

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: तुमच्यापैकी अनेकांनी 'लिशियस' (Licious Business) नाव ऐकलं असेल किंवा त्याची एखादी जाहिरात तरी पाहिली असेल. नॉनव्हेज अर्थात मांसाहारी पदार्थांचे शौकिन असणाऱ्या लोकांमध्ये सध्या हे नाव चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. लिशियस ही बंगळुरूस्थित एक कंपनी आहे. ही कंपनी मांस आणि सीफूड वितरणाचं काम करते. काही दिवसांपूर्वीच 52 दशलक्ष डॉलरचं फंडिंग मिळाल्यामुळे ही कंपनी भारतातील 'युनिकॉर्न क्लब'मध्ये पोहचली आहे. 2021 मध्ये युनिकॉर्न क्लबमध्ये दाखल झालेल्या कंपन्यांमध्ये लिशियसनं 29 वे स्थान मिळवलं आहे. ही भारतातील पहिली डायरेक्ट टू कंज्युमर (direct-to-consumer) युनिकॉर्न कंपनी असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या कंपनीची सुरुवात कशी झाली आणि अल्पावधीतच कंपनीनं अब्जावधी रुपयांचा व्यवसाय कसा उभा केला याची माहिती आपण घेऊया. मांसविक्री व्यवसायाचा बदलला चेहरा भारतातील सुमारे 73 टक्के लोक मांसाहारी आहेत अशी माहिती एका आकडेवारीतून समोर आली आहे. आपण प्रत्येक गोष्ट खरेदी करताना ब्रँड पाहतो मात्र, मांसाहारी पदार्थांचा ब्रँड पाहत नाही. कारण, आपल्या माहितीनुसार त्याचा कुठला ब्रँडच नाही. याशिवाय भारतातील मांस बाजार कायम विस्कळीत असल्याचं चित्र आहे. प्रत्येक शहरात वेगवेगळे कसाई आणि त्यांची मांसाची दुकाने दिसतात. त्यांचा ना कुठला ब्रँड असतो ना त्यांची क्वालिटी चेक होते. एका लाकडाच्या ठोकळ्यावर मांस कापून काळ्या पिशवीत टाकून ग्राहकाच्या हातात दिलं जातं. नेमकी हीच गोष्ट अभय हंजुरा (Success Story of Abhay Hanjura and Vivek Gupta) आणि विवेक गुप्ता या दोन मित्रांनी हेरली. आपल्या देशातील मीट मार्केटची स्थिती आणि मागणी पाहता यामध्ये व्यवसाय करण्याची चांगली संधी असल्याच त्यांच्या लक्षात आलं. Gold Price: रेकॉर्ड स्तरापेक्षा 9000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं, तपासा आजचा भाव शाकाहारी विवेक बनला मांस विक्रेता! लिशियस सुरू करण्याअगोदर विवेक गुप्तांच्या मनात काही शंका होत्या. विवेकचं कुटुंब शुद्ध शाकाहारी आहे. स्वत: विवेक देखील शाकाहारी होते. जेव्हा ते नोकरीनिमित्त अमेरिकेला गेला तेव्हा त्यांनी नॉनव्हेज पदार्थ खाण्यास सुरुवात केली. मात्र, जर आपण मांसविक्रीचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना कुटुंबाला सांगितली तर ते कितपत पाठिंबा देतील याबाबत विवेकच्या मनात शंका होती, असं त्यांनी Wion टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं. जर मीट मार्केट खरंच 30-40 बिलियन डॉलरची बाजारपेठ आहे तर अजूनपर्यंत कुणाची नजर त्यावर का नाही पडली, हा देखील एक प्रश्न विवेकच्या व्यावसायिक मनाला पडला होता. गुणवत्तेवर दिला भर एक दिवस विवेक आणि अभयला लंचमध्ये बेचव जेवण मिळालं. यावरूनच त्यांना मांसाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याची कल्पना सुचली. जर लोकांची मन जिंकायची असतील तर त्यांना चांगल्या गुणवत्तेच मांस दिलं गेलं पाहिजे. परिणामी त्यांनी 2015 मध्ये बंगळुरूत लिशियसची (How Licious brand started?) सुरुवात केली आणि चांगल्या गुणवत्तेचं मांस वितरीत करायला सुरुवात केली. डिलिशियस मधून 'डी' काढून त्यांनी आपल्या कंपनीच नाव ठेवल. We won't sell what we can't eat ourselves! (जे आम्हीच खाऊ शकत नाही ते आम्ही विकत नाही) हे त्यांच्या कंपनीचं मिशन स्टेटमेंट होतं. फक्त सहा वर्षांच्या काळात ही कंपनी यूनिकॉर्न क्लबमध्ये दाखल झाली आहे. जर्मनीच्या या कंपनीत रिलायन्सची 218 कोटींची गुंतवणूक, बनवणार सिलिकॉन वेफर्स कसं आहे लिशियसचं बिझनेस मॉडेल? 'फार्म टू फोर्क' म्हणजे पोल्ट्रीतून चिकन थेट ग्राहकांच्या ताटात, या बिजनेस मॉडेलनुसार लिशियस काम करते. मधल्या विक्रेत्यांची साखळी वगळून संपूर्ण सप्लाय चेन थेट कंपनीकडून हाताळली जाते. कंपनी पोल्ट्री फार्ममधून मांस खरेदी करते. त्यावर प्रोसेसिंग, स्टोरेज आणि पॅकेजिंग प्रक्रिया करून थेट ग्राहकांपर्यंत पोहचवते. कंपनीचे स्वत:चे प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग युनिट्स आहेत. ऑर्डर केल्यानंतर दीड ते दोन तासांच्या आत पॅक केलेलं स्वच्छ आणि उच्च दर्जाचं मांस ग्राहकांपर्यंत पोहचवलं जात असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. लिशियस चिकन, फिश (मासे), सी-फूड (Sea Food), मटण आणि अंडी विक्री करते. आपल्या प्रत्येक प्रॉडक्टसाठी 150 क्वालिटी चेक असल्याचही कंपनीचं म्हणण आहे. कंपनीतील प्रत्येक व्यक्तीला महत्त्व आपल्या कंपनीतील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे. कंपनीनं जोडलेले सर्व लोक कर्मचारी नसून भागधारक असल्याच विवेक आणि अभयच मत आहे. कंपनीनं डिलिव्हरी हिरो, मीट टेक्निशियनसह प्रत्येक कर्मचाऱ्याला एक्टेंडेड स्टॉक ऑप्शन दिलेला आहे, अशी माहिती विवेकने एका मुलाखतीत दिली आहे.
    First published:

    Tags: Business, Business News, Small investment business

    पुढील बातम्या