तणावग्रस्त व्यक्तींमुळे होतेय हाॅटेल इंडस्ट्रीची वाढ, कोण किती वेळा करतं हाॅटेलिंग?

तणावग्रस्त व्यक्तींमुळे होतेय हाॅटेल इंडस्ट्रीची वाढ, कोण किती वेळा करतं हाॅटेलिंग?

NRAI च्या अहवालानुसार माणसं जेव्हा तणावात असतात, काळजीत असतात तेव्हा ते हाॅटेलमध्ये जाऊन खातात.

  • Share this:

मुंबई, 17 मे : प्रत्येक वीकेण्डला आपल्या सगळ्यांनाच घराबाहेरचं खायला आवडतं. अनेकदा आपण नेटफ्लिक्स किंवा अमेझाॅन प्राइमवर आपला आवडता सिनेमा पाहत पिझ्झा आॅर्डर करतो. नुकताच नॅशनल रेस्टाॅरन्ट असोसिएशन आॅफ इंडियानं ( NRAI ) एक सर्वे केलाय. त्या सर्वेत असं आढळून आलंय की असंख्य ताणतणावांमुळेच हाॅटेल इंडस्ट्रीला चांगले दिवस आलेत.

आयटी क्षेत्राचे वाईट दिवस संपले, 'या' 4 मोठ्या कंपन्यांमध्ये आहेत व्हेकन्सीज्

NRAI च्या अहवालानुसार माणसं जेव्हा तणावात असतात, काळजीत असतात तेव्हा ते हाॅटेलमध्ये जाऊन खातात किंवा घरी वेगवेगळे पदार्थ मागवतात. सर्वसाधारणपणे महिन्याला 2,746 रुपये खाण्यावर खर्च होतात.

भारतीय रेस्टाॅरंट इंडस्ट्रीची वाढ झपाट्यानं होतेय. 2018-19मध्ये 4,23,865 कोटी रुपयांची मार्केट साइझ असलेली ही इंडस्ट्री 2022-23पर्यंत 5,99,789 कोटींपर्यंत पोचेल. असं अहवाल सांगतो.

'या' राज्यांना बसणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा

हा सर्वे 24 शहरांमधल्या 3500 घरांमध्ये करण्यात आला. हाॅटेलिंग करणाऱ्यांमध्ये 26 ते 35 वयोगटातल्या व्यक्ती जास्त आहेत. त्यांना वेगवेगळे पदार्थ चाखायला आवडतात.

हा सर्वे करताना थकलेल्या व्यक्ती, सर्वसाधारण व्यक्ती, वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या व्यक्ती, आरोग्यबद्दल जागरुक असलेल्या व्यक्ती अशा लोकांना हाॅटेलिंगबद्दल विचारलं.

शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी उरले काही तास, 59 जागांसाठी होणार मतदान

तणावग्रस्त व्यक्ती स्वस्त रेस्टाॅरंट ते चांगलं रेस्टाॅरंट निवडतात, असं आढळून आलंय. याचं कारण म्हणजे तिथे सर्विस जलद असते. शिवाय ते टेकअवे किंवा होम डिलिव्हरीलाही प्राधान्य देतात.या अहवालात असंही आढळून आलंय की तणावग्रस्त व्यक्ती किमतीचा फारसा विचार करत नाही. ते कुटुंबाबरोबर किंवा जोडीदाराबरोबर हाॅटेलिंग करतात.

तणावात असलेल्या व्यक्ती बिअर किंवा कोला पिणं पसंत करतात, असंही आढळून आलंय.

या अहवालानुसार यांची पहिली पसंती कॅफे असते. डेझर्ट आणि आइसक्रीम ही दुसरी पसंती असते. ते महिन्यातून सहा वेळा हाॅटेलिंग करतात.

VIDEO: काही कळायच्या आतच डॉक्टरच्या गळ्यातील हिसकावली सोनसाखळी

First published: May 17, 2019, 11:42 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading