Home /News /money /

Share Market Update : सेन्सेक्समध्ये 600 अकांची उसळी, निफ्टीही तेजीत

Share Market Update : सेन्सेक्समध्ये 600 अकांची उसळी, निफ्टीही तेजीत

संमिश्र जागतिक संकेतांमध्‍ये प्री-ओपनिंगमध्ये, सेन्सेक्स 133.82 अंक किंवा 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 57394.40 च्या पातळीवर दिसला, तर निफ्टी 203.20 अंकांनी किंवा 1.19 टक्क्यांनी घसरून 16850.80 च्या पातळीवर होता.

    मुंबई, 30 नोव्हेंबर : मागील काही दिवस दबावात असलेला शेअर बाजारात मंगळवारी सुरुवात चांगली झाली. सेन्सेक्स 600 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. सकाळी 9.45 वाजता सेन्सेक्स 670.24 अंकांनी किंवा 1.17 टक्क्यांनी वाढून 57,930.82 वर ट्रेड करत आहे. याआधी बीएसईचा सेन्सेक्स 238.58 अंकांनी वाढून 57,499.16 वर उघडला होता. त्याच वेळी, NSE चा निफ्टी 51.35 अंकांच्या वाढीसह 17,105.30 वर उघडला. संमिश्र जागतिक संकेतांमध्‍ये प्री-ओपनिंगमध्ये, सेन्सेक्स 133.82 अंक किंवा 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 57394.40 च्या पातळीवर दिसला, तर निफ्टी 203.20 अंकांनी किंवा 1.19 टक्क्यांनी घसरून 16850.80 च्या पातळीवर होता. या स्टॉक्समध्ये तेजी आज BSE वर, Power Grid, Titan, SBI, Bajaj Finance, Bajaj Finserv, Axis Bank, Tech Mahindra, HCL Tech, Infosys, TCS, ITC, Sun Pharma, IndusInd Bank, NTPC, ICICI Bank, Maruti, LT यासह दिग्गज शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. देशातल्या प्रमुख बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर किती देतात व्याजदर; जाणून घ्या माहिती GO FASHION ची आज लिस्टिंग CapitalVia Global Research चे रिसर्च हेड गौरव गर्ग म्हणाले, आम्ही हा IPO 1,170 रुपयांना लिस्टिंग होण्याची अपेक्षा करतो, जी इश्यू किमतीपेक्षा जवळपास 70 टक्के जास्त आहे. दुसरीकडे, मेहता इक्विटीजचे उपाध्यक्ष (रिसर्च) प्रशांत तापसी म्हणाले की, या IPO ला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेषतः HNI आणि QIB गुंतवणूकदारांकडून. त्यामुळे, हा IPO आमच्या इश्यू किमतीच्या जवळपास 65-70 टक्क्यांच्या प्रीमियमवर लिस्टिंग होण्याची आमची अपेक्षा आहे. RD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय; मग तुम्ही हे वाचायलाच हवं 29 नोव्हेंबर भारतीय बाजारातील FII आणि DII आकडेवारी 29 नोव्हेंबर रोजी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात 3,332.21 कोटी रुपयांची विक्री केली. त्याच वेळी, या दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 4,611.41 कोटी रुपयांची खरेदी केली.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Share market

    पुढील बातम्या