मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share Market Update : कालच्या घसरणीनंतर शेअर बाजाराच आज मोठी वाढ, 'हे' स्टॉक तेजीत

Share Market Update : कालच्या घसरणीनंतर शेअर बाजाराच आज मोठी वाढ, 'हे' स्टॉक तेजीत

'शेअर ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंगमधून आम्ही खूप फायदा कमावतो. मी अनेकांना करोडपती केले आहे'

'शेअर ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंगमधून आम्ही खूप फायदा कमावतो. मी अनेकांना करोडपती केले आहे'

सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 28 समभागांमध्ये वाढ दिसून येत आहे. Tata Steel चे शेअर्स आज टॉप गेनर्सच्या यादीत आहेत. त्याचे शेअर्स 3.69 च्या वाढीसह प्रति शेअर 1112.50 रुपयांवर व्यवहार करत आहेत.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 21 डिसेंबर : कालच्या जोरदार घसरणीनंतर आज शेअर बाजाराने (Share Market) जोरदार वापसी केली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 1064 अंकांनी वाढून 56,887 वर पोहोचला. या काळात गुंतवणूकदारांच्या (Investors) संपत्तीत 5 लाख कोटींची वाढ झाली आहे. Tata Steel चा शेअर काल 1072 रुपयांवर बंद झाला होता आणि आज 4.33 टक्के वाढून 1119 रुपयांवर पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक संकेतांदरम्यान, आज 21 डिसेंबर 2021 रोजी भारतीय शेअर बाजारात जोरदार सुरुवात झाली. शेअर बाजार उघडण्याच्या काही मिनिटांतच सेन्सेक्सने 525 अंकांपेक्षा जास्त वाढ नोंदवली. मात्र काही मिनिटांनंतर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा सेन्सेक्स सेन्सेक्स 474.31 अंकांनी किंवा 0.85 टक्क्यांनी वाढून 56,296.32 च्या पातळीवर पोहोचला. सोबतच नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी देखील 144.75 अंकांच्या किंवा 0.87 टक्क्यांच्या वाढीसह 16,785.95 च्या पातळीवर ट्रेड करत आहे.

Multibagger Stock : एक रुपयाच्या स्टॉकची कमाल, वर्षभरात एक लाखाची गुंतवणूक बनली 39 लाख

या स्टॉक्समध्ये तेजी

आजच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 28 समभागांमध्ये वाढ दिसून येत आहे. Tata Steel चे शेअर्स आज टॉप गेनर्सच्या यादीत आहेत. त्याचे शेअर्स 3.69 च्या वाढीसह प्रति शेअर 1112.50 रुपयांवर व्यवहार करत आहेत. याशिवाय HCL Tech, Wipro, Tech Mahindra, Sun Pharma, Titan, NTPC, TCS, Reliance इत्यादी शेअर्स तेजीसह व्यवहार करताना दिसत आहेत.

NSE वर F&O बंदी अंतर्गत येणारे स्टॉक

21 डिसेंबर रोजी, 2 स्टॉक्स NSE वर F&O बंदी अंतर्गत आहेत. यामध्ये Escorts आणि Indiabulls Housing Finance च्या नावांचा समावेश आहे. मार्केट वाइड पोझिशन मर्यादेपेक्षा जास्त असल्यास F&O विभागामध्ये समाविष्ट केलेले स्टॉक्स बंदी श्रेणीमध्ये ठेवले जातात.

MapmyIndia च्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल, 1033 रुपये इश्यू प्राइस 1565 रुपये लिस्टिंग प्राईज

CMS Info Systems IPO आज उघडणार

CMS Info Systems चा IPO आज म्हणजेच 21 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडत आहे आणि 23 डिसेंबर 2021 पर्यंत खुला असेल. 1,100 कोटी रुपयांचा हा पब्लिक इश्यू 100 टक्के ऑफर फॉर सेल (OFS) आहे आणि त्याची किंमत बँड प्रति इक्विटी शेअर 205-216 रुपये निश्चित करण्यात आली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आज ग्रे मार्केटमध्ये CMS Info Systems चे शेअर्स 30 रुपयांच्या प्रीमियमसह व्यवहार करत आहेत.

First published:

Tags: Investment, Money, Share market