• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Stock Market Update : गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस दिलासादायक, सेन्सेक्समध्ये 198 अंकाची वाढ

Stock Market Update : गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस दिलासादायक, सेन्सेक्समध्ये 198 अंकाची वाढ

आज SENSEX 198.44 अंकांच्या किंवा 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 58,653.41 वर बंद झाला. तर NSE चा NIFTY 86.80 अंक किंवा 0.5 टक्क्यांच्या वाढीसह 17,503.35 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर हिरव्या रंगात बंद झाले, तर 10 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : सोमवारी मोठ्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजार थोडासा सावरताना दिसला. दिवसभराच्या अस्थिरतेनंतर SENSEX 198.44 अंकांच्या किंवा 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 58,653.41 वर बंद झाला. तर NSE चा NIFTY 86.80 अंक किंवा 0.5 टक्क्यांच्या वाढीसह 17,503.35 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 शेअर हिरव्या रंगात बंद झाले, तर 10 शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. आज वधारलेले शेअर्स आज BSE वर PowerGrid, NTPC, Tata steel, Bharti Airtel, Sun Pharma, Bajaj Finserv, LT, SBI, Kotak Bank, Tech Mahindra, Reliance, Nestle India, Bajaj Finance, HDFC, HCL Tech, ITC, DR. Reddy, TCS, Hindustan Uniliver आणि Ultra Cement चे शेअर वधारले. दुसरीकडे, IndusInd Bank, Asian Paint, Infosys, Bajaj Auto, Maruti, M&M, Titan, Axis Bank, ICICI Bank या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. BharatPe चे संस्थापक Paytm च्या विजय शेखर शर्मांवर संतापले; गुंतवणूकदारांच्या नुकसानीसाठी जबाबदार धरलं या IPO ची शेअर बाजारात जबरदस्त एंट्री Latent view analytics च्या शेअर्सने मंगळवारी शेअर बाजारात धमाका केला. कंपनीचे शेअर्स त्याच्या इश्यू किमतीपेक्षा 169 टक्के जास्त किंमतीसह 530 रुपयांवर लिस्ट झाले आणि नंतर ते 179 टक्क्यांपर्यंत वाढले. जरी त्याचे शेअर्स नंतर ट्रेडिंगच्या वेळी 489.1 रुपयांपर्यंत खाली आले, परंतु ते त्याच्या इश्यू किमतीच्या 148.3 टक्के प्रीमियमवर ट्रेड करत आहे. Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी इलॉन मस्कसोबत केली स्वत:ची तुलना, काय आहे कारण? पेटीएमच्या शेअरमध्ये उसळी पेटीएमचे शेअर (Paytm Share) आज 9 टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना (Paytm Investors) काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. Paytm ची मूळ कंपनी One97 Communications चे शेअर्स आज म्हणजेच 23 नोव्हेंबरला 9.58 टक्क्यांनी रिकव्हरी होऊन 1,489.80 रुपयांवर पोहोचले. पेटीएमचे शेअर काल 22 नोव्हेंबर रोजी 1,360.30 वर बंद झाला. जो त्याच्या 2,150 रुपयांच्या लिस्टिंग किमतीपेक्षा 35 टक्क्यांनी कमी होता.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: