मराठी बातम्या /बातम्या /मनी /शेअर बाजारात आज मोठी घसरण, सेन्सेक्स 764 तर निफ्टी 204 अंकांनी खाली

शेअर बाजारात आज मोठी घसरण, सेन्सेक्स 764 तर निफ्टी 204 अंकांनी खाली

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. बँकिंग, FMCG, एनर्जी शेअर्समध्ये विक्री दिसून आली आहे. आयटी, फार्मा, ऑटो शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसत होता.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. बँकिंग, FMCG, एनर्जी शेअर्समध्ये विक्री दिसून आली आहे. आयटी, फार्मा, ऑटो शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसत होता.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. बँकिंग, FMCG, एनर्जी शेअर्समध्ये विक्री दिसून आली आहे. आयटी, फार्मा, ऑटो शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसत होता.

मुंबई, 3 डिसेंबर : आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्स 764.83 अंकांनी म्हणजेच 1.31 टक्क्यांनी घसरून 57,696.46 वर बंद झाला. तर NSE निफ्टी 204.95 किंवा 1.18 टक्क्यांनी घसरून 17,196.70 वर बंद झाला.

आजच्या व्यवहाराच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्समधील 30 पैकी 5 समभाग तेजीत राहिले तर 25 समभागांमध्ये घसरण दिसून आली. L&T शेअर्समध्ये मोठी वाढ दिसली तर सर्वात मोठी घसरण पॉवर ग्रीडच्या (PowerGrid Share) शेअर्समध्ये झाली. पॉवर ग्रिडचा शेअर 4 टक्क्यांहून अधिक घसरला.

अनेक शेअर्समध्ये घसरण

पॉवरग्रिडचा स्टॉक 4.03 टक्क्यांनी खाली आला आहे. यानंतर रिलायन्सचा शेअर (Reliance Share) 2.80 टक्क्यांनी घसरला. एशियन पेंट (Asian Paint), कोटक बँकेचे (Kotak Bank) शेअर्स 2-2 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. Tech Mahindra, Maruti, Bharti Airtel, ITC, Sun Pharma, Doc Reddy, M&M, Bajaj Finance, Hindustan Unilever, HDFC, Bajaj Finserv, NTPC, HCL Tech, Nestle India, Bajaj Auto, SBI यांचे शेअर्स 1 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. LT, IndusInd Bank, Ultra Cement and Tata Steel and TCS च्या शेअर्समध्ये हलकी खरेदी दिसून आली.

पेनी स्टॉकचा धमाका! 2 रुपयांचा स्टॉक 74 रुपयांवर, सहा महिन्यात 1 लाख बनले 34 लाख

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात विक्रीचा जोर दिसून आला. बँकिंग, FMCG, एनर्जी शेअर्समध्ये विक्री दिसून आली आहे. आयटी, फार्मा, ऑटो शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसत होता. लघू-मध्यम शेअर्सची (Small-Medium Shares) हालचालही आज सपाट राहिली. बीएसई मिडकॅप निर्देशांक आज 0.03 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.29 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सहज उपलब्ध होणार कर्ज, SBI ची Adani Capital शी हातमिळवणी

ओएनजीसी रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत

ऑईल आणि नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ने रिन्युएबल एनर्जी, विशेषत: सोलार एनर्जीमध्ये प्रवेश वाढवण्यासाठी गुरुवारी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) सोबत करार केला. या करारांतर्गत, ONGC आणि SECI सोलार विंड, सोलार पार्क, EV वॅल्यू चेन, ग्रीन हायड्रोजन आणि स्टोरेजशी संबंधित रिन्यूएबल प्रकल्पांवर एकमेकांना सहकार्य करतील. ONGC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाष कुमार आणि SECI चे व्यवस्थापकीय संचालक सुमन शर्मा यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

First published:

Tags: Money, Share market