मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share Market Update : शेअर बाजारात आज घसरणीची शक्यता, विचारपूर्वक गुंतवणूक करा

Share Market Update : शेअर बाजारात आज घसरणीची शक्यता, विचारपूर्वक गुंतवणूक करा

Share Market Update: आज जागतिक बाजारपेठेत घसरण होत असून, याचा परिणाम देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या भावनेवरही होईल आणि विक्रीचा बाजारावर वर्चस्व राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

    मुंबई, 2 ऑगस्ट : भारतीय शेअर बाजाराने गेल्या आठवड्यात जबरदस्त तेजी दाखवली आणि या आठवड्याची सुरुवातही मोठ्या तेजीने झाली. मात्र आज मंगळवारी बाजारावर दबाव दिसून येत आहे. मागील सत्रात 545 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स 58,115 वर बंद झाला, तर निफ्टी 182 अंकांनी चढत 17,340 वर पोहोचला. आज जागतिक बाजारपेठेत घसरण होत असून, याचा परिणाम देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या भावनेवरही होईल आणि विक्रीचा बाजारावर वर्चस्व राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. असे झाले तर चार सत्रांनंतर बाजाराच्या तेजीला आज ब्रेक लागू शकतो. जुलै महिना हा यूएस शेअर बाजारासाठी गेल्या 22 वर्षांतील सर्वोत्तम होता आणि वर्ष 2000 नंतरची सर्वोत्तम वाढ पाहिली गेली. पण, ऑगस्टच्या पहिल्या दिवशी शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, अमेरिकन बाजाराने ही तेजी गमावली आणि सर्व प्रमुख एक्सचेंज घसरणीसह बंद झाले. S&P 500 0.28% घसरला तर Nasdaq 0.18% खाली बंद झाला. त्याचप्रमाणे डाऊ जोन्स देखील 0.14% घसरला. युरोपीय बाजारही कोसळला अमेरिकेच्या धर्तीवर युरोपातील बाजारांतही शेवटच्या व्यापार सत्रात घसरण झाली आणि सर्व प्रमुख शेअर बाजार तोट्यात बंद झाले. युरोपातील प्रमुख बाजारांमध्ये समाविष्ट असलेला जर्मनीचा शेअर बाजार मागील सत्रात 0.03 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला, तर फ्रेंच बाजार 0.18 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. त्याचप्रमाणे लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये 0.13 टक्क्यांची घसरण झाली. नागपुरात CNGचा भडका! पेट्रोल आणि डिझेलपेक्षा महाग विकलं जातंय सीएनजी आशियाई बाजारही घसरले आज सकाळी आशियातील बहुतांश शेअर बाजार लाल चिन्हावर उघडले आहेत. सिंगापूर स्टॉक एक्स्चेंज 0.29 टक्‍क्‍यांनी, तर जपानचा निक्केई 1.22 टक्‍क्‍यांनी घसरला. याशिवाय दक्षिण कोरियाचा कॉस्पी शेअर बाजार 0.31 टक्के आणि चीनचा शांघाय कंपोझिट 0.01 टक्क्यांनी घसरत आहे. एकच नंबर! Home Loan EMI सोबतच सुरु करा SIP, 20 वर्षांत घराची पूर्ण किंमत होईल रिकव्हर परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी भारतीय शेअर बाजाराच्या तेजीचे सर्वात मोठे कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांची सततची खरेदी. गेल्या सत्रातही विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बाजारात 2,320.61 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. दरम्यान, देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 822.23 कोटी रुपयांचे शेअर विकले.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या