मुंबई, 17 मे : भारतीय शेअर बाजारात (Share Market ) मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीचे संकेत आहेत. जागतिक बाजाराचा (Global Market) प्रभाव आणि देशांतर्गत कारणांमुळे सकारात्मक भावना यामुळे गुंतवणूकदार आजही खरेदीच्या मूडमध्ये असू शकतात. सोमवारी सेन्सेक्स (Sensex) 180 अंकांच्या वाढीसह 52,974 वर बंद झाला, तर निफ्टी (Nifty) 60 अंकांनी वाढून 15,842 वर बंद झाला. याआधी, सलग 6 व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्स 5 टक्क्यांपर्यंत घसरला होता. आजच्या व्यवहारात सुरुवातीचा नफा होताच सेन्सेक्स 53 हजारांचा टप्पा पार करेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुंतवणूकदारांची सकारात्मक भावना कायम राहिल्यास बाजारात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे.
यूएस आणि युरोपियन बाजारांची स्थिती
अमेरिकन शेअर बाजार सध्या महागाईचा दबाव आणि मंदीच्या भीतीशी झुंज देत आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात अमेरिकेचे प्रमुख स्टॉक एक्सचेंज नॅस्डॅक 1.20 टक्क्यांनी घसरून बंद झाले. त्याचप्रमाणे युरोपीय शेअर बाजारावरही दबाव असून गेल्या ट्रेडिंग सत्रात युरोपातील प्रमुख शेअर बाजार जर्मनीमध्ये 0.45 टक्क्यांची घसरण झाली, तर फ्रेंच शेअर बाजार 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. मात्र, फ्रेंच शेअर बाजार 0.63 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
ICICI बँकेकडून पुन्हा एकदा FD व्याजदरात वाढ; 20 बेसिक पॉईंटपर्यंत वाढ, तुम्हाला कसा होईल फायदा
आशियाई बाजार तेजीत
आशियातील सर्व प्रमुख शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारात तेजी पाहायला मिळत आहे. सिंगापूरचे स्टॉक एक्स्चेंज 0.27 टक्क्यांनी व जपानचे निक्केई 0.44 टक्क्यांनी वधारत होते. याशिवाय हाँगकाँगमध्ये 1.87 टक्के आणि तैवानमध्ये 0.85 टक्के वाढ झाली आहे. दक्षिण कोरियाचा शेअर बाजारही 0.80 टक्क्यांनी वधारला आहे, तर चीनचा शांघाय कंपोझिट 0.16 टक्क्यांनी वधारत आहे.
तरुणांनी करिअरच्या सुरुवातीलाच घर घरेदी करावं का? काय होईल फायदा? तज्ज्ञांचं मत जाणून घ्या
परदेशी गुंतवणूकदारांची बंपर विक्री
भारतीय शेअर बाजारातून परकीय गुंतवणूकदारांची माघार घेण्याची प्रक्रिया संपत नाही. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) शेवटच्या ट्रेडिंग सत्रातही बाजारातून 1788.93 कोटींचे शेअर्स काढून घेतले. या कालावधीत, देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी बाजारात 1,428.39 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले. यामुळेच सहा सत्रांनंतर बाजार तेजीसह बंद झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market