Home /News /money /

Share Market: शेअर बाजारात आज तेजीची शक्यता, कोणते फॅक्टर्स ठरतील महत्त्वाचे? वाचा सविस्तर

Share Market: शेअर बाजारात आज तेजीची शक्यता, कोणते फॅक्टर्स ठरतील महत्त्वाचे? वाचा सविस्तर

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स 137 अंकांनी घसरून 52,794 वर बंद झाला होता, तर निफ्टी 26 अंकांच्या घसरणीसह 15,782 वर पोहोचला होता. जागतिक बाजाराच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा आजच्या व्यवहारावर विशेष परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 मे : गेल्या आठवड्यात झालेला तोटा मागे टाकून भारतीय शेअर बाजार (Share Market) आज नफा कमावण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसते. जागतिक घटक आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या (Investors) सकारात्मक हालचालीमुळे आज बाजाराची सुरुवात वाढीने होऊ शकते. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स (Sensex) 137 अंकांनी घसरून 52,794 वर बंद झाला होता, तर निफ्टी (Nifty) 26 अंकांच्या घसरणीसह 15,782 वर पोहोचला होता. जागतिक बाजाराच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा आजच्या व्यवहारावर विशेष परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यातील मोठ्या घसरणीतून सावरल्यानंतर आज शेअर बाजार पुन्हा तेजीच्या मार्गावर येऊ शकेल, अशी अपेक्षा आहे. LIC चे स्वस्तात शेअर खरेदीची संधी, कसं? तज्ज्ञांकडून समजून घ्या यूएस आणि युरोपियन बाजार अमेरिकेतील व्याजदरात वाढ झाल्यापासून दबावाखाली असलेल्या शेअर बाजाराने आता तेजीचा कल पकडला आहे. प्रमुख स्टॉक एक्स्चेंज Nasdaq ने गेल्या ट्रेडिंग सत्रात 3.82 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. त्याचा परिणाम युरोपीय बाजारांवरही दिसून आला आणि सर्व प्रमुख शेअर बाजार तेजीत बंद झाले. युरोपीय बाजारात जर्मनीचे शेअर बाजार 2.10 टक्क्यांनी वाढून बंद झाले, तर फ्रान्सच्या शेअर बाजारात 2.52 टक्क्यांनी वाढ झाली. याशिवाय लंडन स्टॉक एक्सचेंजही 2.55 टक्क्यांच्या उसळीसह बंद झाला. आशियाई बाजार हिरव्या चिन्हावर उघडला सोमवारी सकाळी आशियातील बहुतांश शेअर बाजार तेजीसह उघडले. सिंगापूर स्टॉक एक्स्चेंज 0.55 टक्‍क्‍यांनी वाढताना दिसत आहे, तर जपानच्‍या निक्केई स्‍टॉक एक्‍सचेंज 1 टक्‍क्‍याच्‍या उसळीसह व्‍यापार करत आहे. हाँगकाँगच्या शेअर बाजारात 0.68 टक्क्यांनी वाढ होत आहे तर तैवानच्या शेअर बाजारात 1.04 टक्क्यांची वाढ होत आहे. दक्षिण कोरियाचा एक्सचेंज देखील 0.11 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता, तर चीनचा शांघाय कंपोझिट 0.10 टक्क्यांनी वाढला आहे. Cibil स्कोअर जितका चांगला तितकी कर्ज मिळण्याची शक्यता वाढते; लगेच चेक करा तुमचा सिबिल स्कोअर परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांची विक्री वाढत आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) शेअर्स विकून भारतीय बाजारातून 3,780.08 कोटी रुपये काढले. या कालावधीत देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3,169.62 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असली, तरी बाजारातील घसरणीचा कल कायम राहिला.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या