मुंबई, 7 डिसेंबर : भारतीय शेअर बाजारासाठी आजचा मंगळवार चांगला होता. शेअर बाजारात आज पुन्हा तेजी दिसून आली. सेन्सेक्स 886.51 अंकांच्या वाढीसह 57,633.65 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी 264.45 अंकांच्या वाढीसह 17,176.70 वर बंद झाला. बँक निफ्टीमध्येही 882 अंकांची वाढ दिसून आली.
BSE च्या सर्व सेक्टर इंडेक्समध्ये खरेदी दिसून आली. Metal, Bank, Raalty, Auto शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली. निफ्टीच्या 50 पैकी 45 शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 स्टॉक्समध्ये खरेदी झाली. निफ्टी बँकेचे सर्व 12 शेअरमध्ये खरेदी करण्यात आली आहे.
Bank, Metal आणि Financial शेअर्स वधारले
निफ्टीने पुन्हा एकदा 17,100 ची पातळी ओलांडली आहे. निफ्टीने आज इंट्राडेमध्ये 17,171.60 चा उच्चांक सेट केला. त्याचप्रमाणे सेन्सेक्सनेही आज इंट्राडेमध्ये 57,642.24 चा उच्चांक गाठला. दोन्ही सेन्सेक्स निफ्टी आज 1.5 टक्क्यांहून अधिक वाढ दाखवत होते. आज बँका, मेटल आणि फायनान्शियल स्टॉक्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली.
बाजारात तेजी का आली?
कोरोना व्हायरसच्या नवीन वेरिएंटची भीती कमी झाली आहे. कोविड-19 च्या ओमिक्रॉन स्ट्रेनच्या प्राथमिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की हा व्हायरस खूप वेगाने पसरतो, परंतु त्याचा प्रभाव डेल्टा प्रकारापेक्षा खूपच सौम्य आहे. व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनीही या व्हायरसशी संबंधित प्रारंभिक डेटा अतिशय उत्साहवर्धक असल्याचे म्हटले आहे. या अहवालांमुळे कोरोना प्रकारांची भीती थोडी कमी झाली आहे. ज्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम होत आहे.
यूएस मार्केटमध्ये मजबूत नफा
सर्व सकारात्मक बातम्यांदरम्यान, सोमवारी अमेरिकन बाजारांमध्ये जोरदार वाढ झाली. त्याचा परिणाम आशियाई बाजारांवरही दिसून आला. त्यामुळे Hang Seng 1.8 टक्के, Kospi 0.6 टक्के आणि Nikkei 2 टक्के वधारले आहेत. Tencent ने हाँगकाँग बेंचमार्क इंडेक्सवर सुमारे 3 टक्क्यांची वाढ केली आहे. तर अलीबाबा 10 टक्के वधारला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market