Home /News /money /

शेअर बाजारातील मोठ्या घसरणीत परदेशी ब्रोकरेज फर्म्सकडून 'या' शेअर्सला पसंती, चेक करा लिस्ट

शेअर बाजारातील मोठ्या घसरणीत परदेशी ब्रोकरेज फर्म्सकडून 'या' शेअर्सला पसंती, चेक करा लिस्ट

बाजारात कमजोरी असूनही असे काही शेअर्स आहेत ज्यात विश्लेषकांना अजूनही बरीच ताकद दिसते. मंदीच्या काळातही हे शेअर्स चांगला परतावा देतील असा विदेशी ब्रोकरेज हाऊसेसना विश्वास आहे. विदेशी ब्रोकरेज हाऊसेसने ज्या 5 शेअर्सच्या टार्गेट प्राईज वाढवल्या आहेत त्यावर नजर टाकुया.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जानेवारी : शेअर बाजारात 27 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. यूएस फेडने मार्चमध्ये व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्याने भारतीय शेअर बाजार घसरला. बाजार दोन टक्क्यांहून अधिक घसरला. या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी शेअर बाजार काहीसा स्थिर होता, मात्र आज पुन्हा त्यात घसरण झाली आहे. दरम्यान, कोटक बँकेचे (Kotak Bank) एमडी उदय कोटक यांनी म्हटले आहे की, बाजारात अधिक अस्थिरतेसाठी तयार राहा. अमेरिकेतील व्याजदर आणि महागडे क्रूड यामुळे बाजारात अस्थिरता वाढेल. त्यांनी भारतासाठी आर्थिक आणि चलनविषयक धोरण पुनरावलोकनाचा सल्ला दिला आहे. या शेअर्समधून कमाईची संधी बाजारात कमजोरी असूनही असे काही शेअर्स आहेत ज्यात विश्लेषकांना अजूनही बरीच ताकद दिसते. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, क्रेडिट सुइससह (Credit Suisse) विदेशी ब्रोकरेज हाऊसने अनेक कंपन्यांच्या शेअर्ससाठी त्यांचे टार्गेट वाढवले ​​आहे. मंदीच्या काळातही हे शेअर्स चांगला परतावा देतील असा त्यांचा विश्वास आहे. विदेशी ब्रोकरेज हाऊसेसने ज्या 5 शेअर्सच्या टार्गेट प्राईज वाढवल्या आहेत त्यावर नजर टाकुया. एक लाख रुपये गुंतवून मिळवा 60 लाखांपर्यंतचा नफा, जाणून घ्या चंदनाच्या शेतीची संपूर्ण माहिती आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) : क्रेडिट सुइस आयसीआयसीआय बँकच्या स्टॉकवर बुलिश आहे. या स्टॉकला आउटपरफॉर्म रेटिंग देत, ब्रोकरेज फर्मने आपले टार्गेट 900 रुपयांवरून 930 रुपये केले आहे. एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी (SBI Life Insurance Company) : नोमुरा होल्डिंग्सने (Nomura Holdings) या स्टॉकला बाय रेटिंग देताना आपले टार्गेट 1500 रुपयांवरून 1625 रुपये केले आहे. नोमुराला विश्वास आहे की कंपनी टार्गेट प्राईज गाठण्याची सर्व शक्यता आहे. बंधन बँक (Bandhan Bank) : CLSA ने या स्टॉकचे रेटिंग Sell वरून Outperform वर अपग्रेड केले आहे. तसेच, त्याची टार्गेट प्राईज 340 रुपयांवरून 345 रुपये करण्यात आली आहे. पहिल्यांदा Credit Card घ्यायचा विचार करताय? 'या' पाच क्रेडिट कार्डवरील ऑफर एकदा चेक करा ग्लँड फार्मा (Gland Pharma) : विदेशी ब्रोकरेज फर्म जेफरीज (Jefferies) फार्मास्युटिकल क्षेत्रातील कंपनी Gland Pharma वर बुलिश आहे. या स्टॉकला बाय रेटिंग देत, ब्रोकरेज फर्मने आपले टार्गेट 4566 रुपयांवरून 4578 रुपये केले आहे. पीव्हीआर (PVR) : CLSA ला PVR मध्ये भरपूर क्षमता वाटते. या स्टॉकला बाय रेटिंग देत, CLSA ने आपले टार्गेट 2105 रुपयांवरून 2110 रुपये केले आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या