Home /News /money /

शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं 4 दिवसात 8 लाख कोटींचं नुकसान, काय आहेत कारणं?

शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं 4 दिवसात 8 लाख कोटींचं नुकसान, काय आहेत कारणं?

आज सेन्सेक्स 427.44 अंकांनी किंवा 0.74 टक्क्यांनी घसरून 59,037 वर आणि निफ्टी 109.75 अंकांनी किंवा 0.79 टक्क्यांनी घसरून 17,617.15 वर होता. दुसरीकडे, निफ्टी मिडकॅप (Nifty Midcap), स्मॉल कॅप (Nifty Small cap)सह सर्व निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 जानेवारी : बेंचमार्क इक्विटी इंडेक्स सलग चार ट्रेडिंग सत्रांमध्ये जवळपास 4 टक्क्यांनी घसरला आहे, परिणामी इक्विटी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. आज सेन्सेक्स 427.44 अंकांनी किंवा 0.74 टक्क्यांनी घसरून 59,037 वर आणि निफ्टी 109.75 अंकांनी किंवा 0.79 टक्क्यांनी घसरून 17,617.15 वर होता. दुसरीकडे, निफ्टी मिडकॅप (Nifty Midcap), स्मॉल कॅप (Nifty Small cap)सह सर्व निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य इनवेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही के विजयकुमार यांनी एका नोटमध्ये म्हटलं की, नॅस्डॅककडून टेक हेवीवेट्समध्ये झालेल्या घसरणीमुळे यूएस बाजार सलग पाचव्या दिवशी कमजोर राहिले आहेत. त्याचा परिणाम भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रावरही दिसून येत आहे, जे मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहे. सध्याच्या घसरणीमागील कारणे पाहूयात ग्लोबल मार्केट अमेरिकन बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत असून, तेथे गुरुवारी सलग पाचव्या दिवशी कमजोरी दिसून आली. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीच्या अपेक्षेने ग्लोबल बॉण्ड यील्ड वाढ केल्याने गुंतवणूकदारांना जोखीम घेणे टाळण्यास भाग पाडले आहे आणि त्यामुळे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कमी जोखमीच्या मालमत्तेचा समावेश आहे. सोने आणि स्विस फ्रँक यांसारखी चलने जोखीम टाळण्याचा धोका दर्शवतात. LIC Scheme : एकदाच प्रीमियम भरा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा; काय आहे LIC ची योजना? आर्थिक अडचणी केवळ अमेरिकाच नाही तर भारताची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. यामुळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) हळूहळू लिक्विडिटीच्या नॉर्मलायजेशनकडे वाटचाल करत आहे. कॉल मनी रेटने 4.55 टक्‍क्‍यांचा उच्चांक गाठला आहे, जो मागील महिन्यात 3.25-3.50 टक्‍क्‍यांनी वाढला होता. कॉल मनी रेट म्हणजे बँक ज्या दराने कर्ज घेतात. कॉल रेटमधील वाढीसह, त्रि-पक्षीय रेपो डिलिंग आणि सेटलमेंट देखील 4.24 च्या पातळीवर पोहोचले, जे डिसेंबरच्या अखेरीस सुमारे 3.5 टक्के होते. FPIs ची विक्री विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून (foreign portfolio investors) विक्री सुरुच आहे. कारण वाढत्या ग्लोबल बॉण्ड यील्ड मधून ते बाहेर पडत आहेत. दरम्यान जपान आणि युरोप सारख्या आकर्षक मूल्याच्या बाजारपेठांमध्ये जात असल्याने त्यांची विक्री सुरूच आहे. एकूणच, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरपासून आतापर्यंत 1 लाख कोटी रुपयांची विक्री केली आहे. PNB Insta Loan: झटपट मिळवा 8 लाखांचं कर्ज, बँक देतेय संधी;हे शुल्क देखील आहे माफ मार्जिन आणि डिमांडची चिंता डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीतील भारतीय कंपन्यांच्या कमाईने त्यांच्या ऑपरेटिंग मार्जिनवर मोठा दबाव दर्शवला आहे आणि त्यांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर (Hindustan Unilever) सारख्या कंपन्यांच्या इनिशियल कमेन्ट्रीने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दबाव असल्याचे सूचित केले असताना, बजाज फायनान्सने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की शहरी भागातील कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांनाही साथीच्या रोगाचा फटका बसला आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या