Home /News /money /

शेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद; Sensex 12 अंकांनी तर Nifty 2 अंकांनी खाली

शेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद; Sensex 12 अंकांनी तर Nifty 2 अंकांनी खाली

सेन्सेक्सच्या टॉप-30 शेअरच्या यादीत 18 शेअर लाल चिन्हात बंद झाले. तर आज 12 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. आज TCS च्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली.

    मुंबई, 14 जानेवारी : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सकाळी बाजारात मोठी घसरण झाली, पण दिवसभरात व्यवहार वाढल्याने खरेदी वाढली. यासह सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही थोड्या घसरणीसह बंद झाले. शुक्रवारी व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 12.27 अंकांनी म्हणजेच 0.02 टक्क्यांनी घसरून 61,223 वर बंद झाला. याशिवाय निफ्टी 2 अंकांच्या म्हणजेच 0.01 टक्क्यांच्या घसरणीसह 18,255 च्या पातळीवर बंद झाला. आजच्या व्यवहारात, आयटी, रियल्टी, कॅपिटल गुड्स, पॉवर, युटिलिटी क्षेत्राचे शेअर्स वाढले आणि सुमारे 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. दुसरीकडे, ऑटो, फार्मा, बँक आणि एफएमसीजी क्षेत्रात विक्री दिसून आली. 12 स्टॉक वधारले सेन्सेक्सच्या टॉप-30 शेअरच्या यादीत 18 शेअर लाल चिन्हात बंद झाले. तर आज 12 शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. आज TCS च्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. TCS चे शेअर 1.80 टक्क्यांच्या वाढीसह 3968 रुपयांवर बंद झाला, तर Axis Bank 2.62 टक्क्यांनी घसरून टॉप लूजर ठरला. अॅक्सिस बँकेचा शेअर 721 रुपयांवर बंद झाला. HDFC Securities ची 'या' मल्टीबॅगर एनर्जी स्टॉकवर नजर; आणखी तेजीची शक्यता टॉप गेनर शेअर्स आज TCS, Infosys, Larsen, HDFC Bank, Tech Mahindra, Bajaj Finance, NTPC, Kotak Mahindra, Maruti Suzuki या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. या शेअर्समध्ये घसरण Asian Paints, Axis Bank, Hindustan Liner, HDFC, Wipro, Nestle, Titan, Sun Pharma, SBI, Tata Steel, ITC या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. अवघ्या 12 दिवसात या मल्टीबॅगर Penny Stock ने गुंतवणूकदारांचे पैसे केले डबल, तुमच्याकडे आहे का हा शेअर? क्षेत्रीय निर्देशांक तेजीत क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल बोलायचे झाले तर बँकिंग, फार्मा, ऑईल अँड गॅस, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्र लाल चिन्हात दिसले. त्याच वेळी, आयटी, रिअल इस्टेट, ऊर्जा, इन्फ्रा ही क्षेत्रे हिरव्या रंगात बंद झाले.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या