मुंबई, 22 नोव्हेंबर : गेल्या आठवड्यात बाजारात सतत विक्रीचा दबाव होता आणि सेन्सेक्स-निफ्टी लाल चिन्हावर बंद झाले. 18 नोव्हेंबरला NIFTY 134 अंकांनी घसरून 17765 पातळीवर बंद झाला, तर SENSEX 400 अंकांच्या घसरणीसह 59600 पातळीवर बंद झाला. ब्रॉडर मार्केटमध्येही घसरण झाली आणि बीएसई मिडकॅप इंडेक्स 1.44 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप इंडेक्स 1.63 टक्क्यांनी घसरून बंद झाला.
गुरु नानक जयंतीनिमित्त शुक्रवारी शेअर बाजार बंद राहिला. अशा स्थितीत आज काही शेअर्सवर बरीच हालचाल होताना दिसत आहे. जिथे तुम्ही बातम्यांच्या आधारे कमाई करू शकता. सध्या बातम्यांमध्ये असलेल्या स्टॉक्सवर एक नजर टाकूया.
(Reliance Industries Limited) RIL
RIL आणि Aramco परस्पर संमतीने O2C कराराचे पुनर्विलोकन करतील. रिलायन्स इंडस्ट्रीजने म्हटले आहे की NCLT मधील O2C व्यवसायाच्या डिमर्जरसाठी अर्ज मागे घेतला जात आहे. RIL ने नुकतीच नवीन ऊर्जा व्यवसायात मोठी योजना जाहीर केली आहे. कंपनीच्या बिझनेस पोर्टफोलिओमध्ये झालेल्या बदलांमुळे डीलचा आढावा जाहीर करण्यात आला आहे. Aramco RIL च्या O2C व्यवसायात 20 टक्के हिस्सा घेणार आहे.
जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी नवे संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही
LAURUS LABS
कंपनी ImmunoACT मधील 26.62% स्टेक 46 कोटी रुपयांना खरेदी करेल.
IRB INFRA
प्रेफरेंशियल शेअरद्वारे 5347 कोटी रुपये उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. भागधारकांच्या निधी उभारणीस मान्यता देण्यात आली आहे.
ROUTE MOBILE
ROUTE MOBILE प्रति शेअर 1852 रुपये या दराने QIP द्वारे 867.5 कोटी रुपये उभारेल.
Arvind
फॅब्रिक आणि कपड्यांवरील जीएसटी दर समान असतील. 1 जानेवारीपासून सर्व प्रकारच्या फॅब्रिक-कपड्यांचे दर 12 टक्के वाढले आहेत. दरांमधील बदलामुळे मोठ्या प्रमाणात जीएसटी क्रेडिट निलंबित केले जाऊ शकते. अरविंदची 80 कोटींहून अधिक रक्कम रोखली जाऊ शकते.
Paytmची निराशाजनक एन्ट्री, गुंतवणूकदार चिंतेत; वॉरेन बफे यांना कोट्यवधींचा फायदा
Bharti Airtel
Postpaid नंतर आता भारती एअरटेलने प्रीपेडचे दर वाढवले आहेत. 28 दिवसांच्या पॅकची किंमत 79 वरून 99 करण्यात आली आहे. हे नवे दर 26 नोव्हेंबरपासून लागू होतील.
FTSE
FTSE ने पुनर्संतुलनाची (Rebalencing) घोषणा केली आहे. Lodha, Zomato आणि Sona BLW शेअर स्टॅन्डर्ड इंडेक्सवर समाविष्ट केले जातील तर Clean Science, Small Cap Index अंतर्गत येतील. हा निर्णय 17 डिसेंबरपासून लागू होणार आहे.
(Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money