Stock in News : कोणते स्टॉक आज चर्चेत, चेक करा लिस्ट
Stock in News : कोणते स्टॉक आज चर्चेत, चेक करा लिस्ट
शेअर्सच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून, तुमची गुंतवणूक निश्चितपणे संरक्षित केली जाऊ शकते. येथे आम्ही असे शेअर्स सांगत आहोत जे आज बातम्यांमध्ये असतील आणि ज्यावर बाजाराची नजर असेल.
मुंबई, 24 जानेवारी : शेअर बाजारात गेल्या काही दिवसात मोठी घसरण सुरु आहे. त्यामुळे शेअर्सच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून, तुमची गुंतवणूक निश्चितपणे संरक्षित केली जाऊ शकते. येथे आम्ही असे शेअर्स सांगत आहोत जे आज बातम्यांमध्ये असतील आणि ज्यावर बाजाराची नजर असेल.
RELIANCE IND Q3
डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 41 टक्क्यांनी वाढून 18,549 कोटी झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 13,101 कोटी रुपये होता. कंपनीचे उत्पन्न 1,91,271 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत 1,23,997 कोटी रुपये होते. ब्लूमबर्गच्या सरासरी अंदाजानुसार, रिलायन्सचा निव्वळ नफा 15,264 कोटी रुपये आणि उत्पन्न 1.75 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज होता.
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा निव्वळ नफा 3,615 कोटी रुपये होता, जो मागील तिमाहीपेक्षा सुमारे 2.5 टक्के अधिक आहे. रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. डिसेंबर तिमाहीत रिलायन्स जिओचा महसूल देखील तिमाही आधारावर 3.3 टक्क्यांनी वाढून 19,347 कोटी रुपये झाला आहे.
ICICI Bank
चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत ICICI बँकेच्या निव्वळ नफ्यात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेने शनिवारी 22 जानेवारी रोजी अहवाल दिला की डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 6,193.81 कोटी होता जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 4,939.59 कोटी होता. बँकेचे नेट इंटरेस्ट इनकम 23.44 टक्के वाढून 12236.04 टक्के राहिले, जे कोणत्याही बँकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असतं. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेचे नेट इंटरेस्ट इनकम (NII) 9,912.46 कोटी रुपये होते. डिसेंबर तिमाहीत बँकेच्या इतर स्रोतांमधून मिळणारी कमाई 6.42 टक्क्यांनी वाढून 4,987.07 कोटी रुपये झाली आहे.
JSWSTEEL
JSW STEEL चे तिसर्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी आहेत. नफा 69 टक्के कमी झाला. मात्र ऑपरेटिंग रेव्हेन्यूमध्ये 74 टक्के वाढ झाली आहे.
TITAGARH WAGONS
इटालियन उपकंपनीला 2380 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. इटलीच्या लॅझिओ मेट्रोसाठी ही ऑर्डर प्राप्त झाली आहे.
PHILIPS CARBON
9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत शेअर विभाजनाचा विचार केला जाईल.
Published by:Pravin Wakchoure
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.