मराठी बातम्या /बातम्या /मनी /

गिफ्टचं आमिष दाखवणाऱ्या मेसेजपासून सावध राहा, SBIकडून ग्राहकांना महत्त्वाच्या सूचना

गिफ्टचं आमिष दाखवणाऱ्या मेसेजपासून सावध राहा, SBIकडून ग्राहकांना महत्त्वाच्या सूचना

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय-SBI) आपल्या ग्राहकांना ट्विटरवर (Tweeter) ऑनलाइन फिशिंगपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय-SBI) आपल्या ग्राहकांना ट्विटरवर (Tweeter) ऑनलाइन फिशिंगपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय-SBI) आपल्या ग्राहकांना ट्विटरवर (Tweeter) ऑनलाइन फिशिंगपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली, 06 सप्टेंबर: अलीकडच्या काळात डिजिटल व्यवहारांचं (Digital Transactions) प्रमाण वाढल्यापासून ऑनलाइन फसवणुकीचे (Online Fraud) प्रकारही वाढले आहेत. पोलिसांच्या सायबर विभागाकडे दाखल होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं असून, लोकांना बँका, सरकार आणि पोलिसही वारंवार सावधानतेचा इशारा देत असतात. आपल्या मोबाइलवर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या लिंक्सबाबत सतर्कता बाळगण्याची सूचना सतत दिली जात असते. तरीही सायबर गुन्ह्यांना बळी पडणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. येणाऱ्या सणासुदीच्या कालावधीत अशा प्रकारात वाढ होण्याची शक्यता असल्यानं देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय-SBI) आपल्या ग्राहकांना ट्विटरवर (Tweeter) ऑनलाइन फिशिंगपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. जागरण डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

लोकांना ई-मेल किंवा मोबाइलवर मेसेजद्वारे किंवा व्हॉट्सअॅप चॅटवर भेटवस्तू (Gifts) किंवा कॅश बॅकचं (Cashback) आमिष दाखवणाऱ्या अनेक लिंक्स (Links) येत असतात. त्यापासून दूर राहण्याचा आणि त्यावर क्लिक न करण्याचा सल्ला बँकेनं दिला आहे.

तुमच्या इनबॉक्समध्ये अशा लिंक्स येत असतील तर त्यावर क्लिक करू नका! अशा फिशिंग लिंक्सवर क्लिक केल्यास, तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे गमावू शकता. काळजी घ्या. क्लिक करण्यापूर्वी विचार करा! असं बँकेनं म्हटलं आहे.

दररोज फक्त 70 रुपये गुंतवून काही वर्षांतच बना लखपती; पोस्ट ऑफिसची खास बचत योजना

 'नॅशनलाईज्ड बँकेकडून मोफत भेट असे मेसेज आले तर त्याच्या मोहात पडू नका. अशा लिंक्स या बनावट असतात. या ऑफर किंवा कॅश बॅक घेण्यासाठी, तुम्हाला त्या लिंक्स उघडाव्या लागतील आणि त्यावर काही माहिती द्यावी लागेल. अनेकदा अशा लिंक्सवर क्लिक केल्यास तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. बँकिंगशी संबंधित कोणतीही माहिती इतर कोणाशीही शेअर करू नका असा सल्लाही बँकेनं दिला आहे.

सध्याच्या काळात ऑनलाइन भेटवस्तू (Gifts) पाठवण्याचे प्रमाण वाढलं आहे. अशा फसवणूकीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या सणासुदीच्या कालावधीत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यावेळी सायबर गुन्हेगार एखाद्या कंपनीचे नाव, लोगो यात कळेल न कळेल असा बदल करून बनावट वेबसाईट तयार करून त्याची लिंक पाठवतात आणि तुम्हाला भेटवस्तू पाठवण्यात आली आहे, ती घेण्यासाठी यावर क्लिक करा किंवा त्यासाठी पैसे भरा असे फोन किंवा ईमेल करतात. कंपनीच्या नावाचे स्पेलिंग थोडं वेगळं असतं, चट्कन ते लक्षात येत नाही. लोगोही अगदी किंचित फरक असलेला असतो. त्यामुळे लोक फसतात आणि अशा लिंक्सवर क्लिक करतात किंवा माहिती देतात. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते तोपर्यंत उशीर झालेला असतो.

वाह रे पठ्ठ्या! कंपनीनं क्रेडिट कार्ड देण्यास दिला नकार तर त्यानं सुरु केली लाखो डॉलर्सची कंपनी

अशा ऑनलाइन फिशिंगबाबत सावध राहण्याचा इशारा गती (Gati) या प्रसिद्ध लॉजिस्टिक कंपनीने देखील दिला आहे. कंपनीची एकच वेबसाइट आहे http://www.gati.com आणि लोकांनी कोणत्याही प्रकारच्या लॉजिस्टिक सेवेसाठी (Logistics) या वेबसाइटचा वापर करावा, असा सल्ला कंपनीनं दिला आहे. चुकीच्या कंपनीचे नाव किंवा लोगो वापरून लोकांना फसवण्याचे प्रकार वाढत असल्याने सणासुदीच्या काळात लोकांनी विशेष खबरदारी घ्यावी असा सल्ला कंपनीनं दिला आहे.

First published: