SBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा, चेकबुकसाठी बँक देत आहे ही खास सेवा

SBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा, चेकबुकसाठी बँक देत आहे ही खास सेवा

भारतातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या SBI ने ग्राहकांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. या नवीन सुविधेअंतर्गत ग्राहक आता हव्या त्या पत्त्यावर आपले चेकबुक मागवू शकतात.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : भारतातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या SBI ने ग्राहकांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. या नवीन सुविधेअंतर्गत ग्राहक आता हव्या त्या पत्त्यावर आपले चेकबुक मागवू शकतात. आतापर्यंत बँकेत रजिस्टर्ड असलेल्या पत्त्यावरच बँक चेकबुक मिळत होते. पण आता कोणत्याही पत्त्यावर चेकबुक मागविण्याची सवलत ग्राहकांना दिली असून त्यांना बँकेत जाण्याची देखील आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसून हे चेकबुक मागवू शकता.

या पद्धतीने मागवू शकता चेकबुक

1)कोणत्याही पत्त्यावर चेकबुक मागविण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी इंटरनेट बँकिंगसाठी लॉगइन करावे लागणार आहे.

2)इंटरनेट बँकिंगवर लॉगइन केल्यानंतर रिक्वेस्ट अँड एन्क्वायरी ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.

3) याठिकाणी तुम्हाला चेकबुकसाठी रिक्वेस्ट हा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा.

4) या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एक फॉर्म उघडला जाईल. यामध्ये तुम्हाला अकाउंट नंबर आणि इतर माहिती भरायची आहे.

5)सर्व माहिती भरल्यानंतर आणखी एक पेज ओपन होईल, या ठिकाणी तुम्हाला पत्ता आणि तुमचे नाव भरावे लागेल.

6) ज्या ठिकाणी तुम्हाला चेकबुक मागवायचे आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे.

याआधी कोरोनाचे संकट लक्षात घेऊन बँकेने एटीएमच्या संदर्भात देखील नवीन सुविधा उपलब्ध करून दिली होती. यामध्ये बँकेने डोअरस्टेप एटीएम सर्व्हिस उपलब्ध करून दिली होती. यामध्ये तुम्हाला पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाण्याची गरज भासणार नाही. एका फोन कॉलवर एटीएम तुमच्या दारात येईल. व्हाट्सअप किंवा मोबाईल कॉल करून तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल एटीएमला बोलवू शकता.

यासाठी एसबीआयने दोन मोबाईल क्रमांक जारी केले आहेत. 7052911911 आणि 7760529264 या दोन क्रमांकावर तुम्ही फोन करून किंवा व्हाट्सअप करून हे एटीएम तुमच्या घरी बोलवू शकता. सध्या बँकेने ही सेवा उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये सुरु केली आहे.

Published by: Shreyas
First published: November 20, 2020, 8:22 AM IST
Tags:

ताज्या बातम्या