या कंपनीबरोबर SBI ची हातमिळवणी, डिस्काउंटमध्ये खरेदी करता येईल स्वत:चं घर

या कंपनीबरोबर SBI ची हातमिळवणी, डिस्काउंटमध्ये खरेदी करता येईल स्वत:चं घर

रिअल इस्टेट फर्म Mahindra Lifespace Developers ने स्टेट बँक ऑफ इंडियाबरोबर हातमिळवणी केली आहे. ज्यामुळे ग्राहकांना सोप्या पद्धतीने गृहकर्ज (Home Loan) उपलब्ध होऊ शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेेवारी: रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फर्म असणाऱ्या Mahindra Lifespace Developers ने स्टेट बँक ऑफ इंडियाबरोबर हातमिळवणी केली आहे. ज्यामुळे ग्राहकांना सोप्या पद्धतीने गृहकर्ज (Home Loan) उपलब्ध होऊ शकते. कंपनीने आज MoU वर स्वाक्षरी देखील केली आहे. कंपनीच्या या करारानंतर कर्मचारी आणि ग्राहकांना विशेष सूट मिळणार आहे. महिंद्रा लाइफस्पेस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) देशभरातील घर खरेदीदारांना चांगला अनुभव मिळावा याकरता या करारावर स्वाक्षरी केली आहे.

महिंद्रा लाइफस्पेस आणि SBI मध्ये झालेल्या करारानुसार यामध्ये को-प्रमोशनल अॅक्टिव्हिटी आणि आउटरिच इनिशिएटिव्ह समाविष्ट आहे. याअंतर्गत ग्राहकांना खास सुविधा पुरवल्या जाणार आहेत. कंंपनीकडून काही स्पेशल सवलत देखील ग्राहकांना देण्यात येणार आहे.

कंपनीच्या CEO नी दिली माहिती

महिंद्रा लाइफस्पेसचे सीईओ अरविंद सुब्रमण्यम यांनी या कराराबाबत माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, कंपनीने स्टेट बँकेबरोबर करार केला आहे. यातून महिंद्राची घरं दोन्ही कंपन्यांचे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.

'अनुवी' ते अगदी सिडनी! विराट-अनुष्काच्या मुलीसाठी नेटकऱ्यांनी सुचवली ही नावं

स्टेट बँक ऑफ इंडियाचे चीफ जनरल मॅनेजर आणि रिअल इस्टेट व्हर्टिकल प्रमुख श्रीकांत यांनी अशी माहिती दिली आहे की, भारतीय स्टेट बँकेने आधीच MMR, बंगळुरु, पुणे, चेन्नई आणि नागपुरमध्ये Mahindra Lifespace च्या प्रोजेक्ट्सना परवानगी दिली आहे. या करारानंतर होमबायर्स अनुमोदित परियोजनांसाठी टीआयर आणि व्हॅल्यूएशनवर होणाऱ्या खर्चांवर बचत करता येऊ शकते.'

मित्राची पत्नी निवडणुकीपुरती घेतली 'उधार'; जिंकल्यानंतर फिरली नियत आणि...

Mahindra Lifespace Developers ची स्थापना 1994 साली करण्यात आली होती. सध्या कंपनीचा व्यवसाय 19.4 बिलियन अमेरिकन डॉलर्सचा आहे. भारतातील 7 शहरांमध्ये कंपनीकडून निवासी योजनांच्या सुविधा दिल्या जातात.

First published: January 12, 2021, 8:58 PM IST
Tags: SBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading