• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • SBI च्या कोट्यवधी ग्राहकांनी लक्षात ठेवा हे दोन Toll Free नंबर, बँकेने दिली महत्त्वाची माहिती

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांनी लक्षात ठेवा हे दोन Toll Free नंबर, बँकेने दिली महत्त्वाची माहिती

तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोरोना काळात बँकेने ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस सर्विस (Contact-less Service)सुरू केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 ऑगस्ट: तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोरोना (Banking Services during Corona period) काळात बँकेने ग्राहकांसाठी कॉन्टॅक्टलेस सर्विस (SBI Contactless Service) सुरू केली आहे. आता युजर्स घरबसल्या बँकेशी संबंधित अनेक कामं करू शकतात. याकरता ते मोबाइलवरुन एक कॉल करून ही कामं पूर्ण करू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने जारी केले टोल फ्री नंबर्स SBI ने त्यांच्या ग्राहकांसाटी टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. State Bank of India ने अलीकडेच केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, घरीच सुरक्षित राहा. आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत. SBI तुम्हाला कॉन्टॅक्टलेस सेवा प्रदान करते आहे, ज्यामुळे तुम्हाला आपात्कालीन बँकिंग गरजा पूर्ण करता येतील. 1800 112 211 किंवा 1800 425 3800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा. बँकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत माहिती दिली आहे. एका फोनवर मिळतील महत्त्वाच्या सेवा बँकेने हे ट्वीट करताना त्यासह एक व्हिडीओ देखील जोडला आहे. यामध्ये ग्राहकांना या क्रमांकावर कॉल करून कोणत्या सेवांचा लाभ मिळवता येईल हे सांगण्यात आले आहे. ग्राहक अगदी घरबसल्या या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. या व्हिडीओनुसार, अकाउंट बॅलन्स तपासणे, शेवटच्या पाच ट्रान्झॅक्शनचा तपशील, एटीएम बंद किंवा चालू करणे, एटीएम पिन किंवा ग्रीन पिन जनरेट करणं, नवीन एटीएमसाठी अर्ज करणे इ. कामांसाठी तुम्ही या क्रमांकावर कॉल करू शकता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: