सावधान! फसवणुकीपासून असे रहा सुरक्षित, SBIने दिल्या टिप्स

ऑनलाईन फसवणूक कशा प्रकारे केली जाते याची माहिती एसबीआयने दिली.

  • Share this:

देशातील सर्वात मोठी बँक SBI त्यांच्या ग्राहकांना चांगली आणि सुरक्षित बँकिंग सुविधा देण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असते. आता ग्राहकांना फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी बँक टिप्स देत आहे. ऑनलाईन फसवणूक कशा प्रकारे केली जाते याची माहिती एसबीआयने दिली आहे.

फिंशिंग ई-मेल आणि खोटे संकेतस्थळ : गुन्हेगारांकडून वैयक्तिक, आर्थिक आणि इतर माहिती मिळवण्यासाठी खोट्या लिंक पाठवल्या जातात. या लिंक नामांकित संस्था, सरकारी एजन्सीच्या लिंकसारख्याच असतात. अशा टेक्स्ट संदेशांना आणि लिंकला फिशिंग म्हटलं जातं.

तुम्हालाही एखादा संशयास्पद मेसेज किंवा मेल आला असेल तर त्याला उत्तर देऊ नका. तसेच लिंक ओपन करु नका. मेल किंवा मेसेज संशयास्पद वाटल्यास report.phishing@sbi.co.in. यावर रिपोर्ट करा.

पॉपअप जाहिरात : कोणतेही अॅप वापरत असताना अचानक पॉप अप विंडो ओपन होतात. यावर क्लिक केल्यास स्पायवेअर किंवा अॅडवेअर डाऊनलोड होतात.

तुम्हाला लॉटरी लागली आहे असं सांगणारा निनावी फोन तुम्हाला येतो. सोशल इंजिनिअरिंग आणि व्हॉइस ओव्हर आयपीचा अवैध कामासाठी वापर करण्याला विशिंग म्हणतात.

फसवणूक करणारे कोणत्याही नंबरवरुन फोन करतात. त्यानंतर कोणत्यातरी बँकेकडून कॉल केल्याचे सांगतात आणि तुमच्या खात्याची काहीतरी अडचण झाली असल्याचे सांगत माहिती विचारतात. त्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.

फेक लिंक, व्हॉइस कॉल प्रमाणे खोटे मेसेज पाठवले जातात. अशा प्रकारे फसवणूक करण्याला स्मिशिंग म्हणतात.  मेसेज पाठवून लोकांना जाळ्यात अडकवलं जातं.

कॉम्प्युटरवर टायपिंग केलेली सर्व माहिती रेकॉर्ड करणाऱ्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्रयस्त व्यक्ती हस्तगत करते. आपण सार्वजनिक ठिकाणी जर कॉम्प्युटरवर व्यवहार केल्यास हा धोका संभवतो. यातून बँक खात्याचा डेटा हॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा ठिकाणाहून व्यवहार करताना काळजी घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 01:04 PM IST

ताज्या बातम्या