SBI अलर्ट! 500 आणि 2000 च्या नोटांसंदर्भात जाणून घ्या ही माहिती, नाहीतर होऊ शकते फसवणूक

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सुद्धा आपल्या ग्राहकांना 500 आणि 2000 च्या नोटांबाबत सतर्क राहण्यासाठी अलर्ट पाठवला आहे.

  • Share this:

वी दिल्ली, 25 फेब्रुवारी : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सुरक्षेच्या कारणास्तव 2000 आणि 500 च्या नवीन नोटा जारी केल्या होत्या. नवीन नोटांमध्ये सिक्युरिटी फीचर्समध्ये आधीच्या तुलनेत सुधारणा करण्यात आल्या होत्या. जेणेकरून बाजारात आलेल्या बनावट नोटांची समस्या संपवता येईल. मात्र या सिक्युरिटी फीचर्स असणाऱ्या नोटा बाजारात आणूनही बनावट नोटांच्या काही घटना समोर आल्या आहेत. बाजारात नकली नोटांची समस्या वाढली आहे. त्यामुळे देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सुद्धा आपल्या ग्राहकांना 500 आणि 2000 च्या नोटांबाबत सतर्क राहण्यासाठी अलर्ट पाठवला आहे.  अशा बनावट नोटांपासून ग्राहकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. सामान्य नागरिकांनी 500 आणि 2000 च्या या नोटा नेहमी तपासून घेणं आवश्यक आहे. खऱ्या आणि बनावट नोटांमधील फरक ओळखणं आवश्यक आहे ज्यामुळे तुम्ही तुमचं होणार नुकसान टाळू शकता.

SBI कडून अलर्ट जारी

नुकतच SBI ने आपल्या ग्राहकांना ट्वीटच्या माध्यमातून सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. ग्राहकांनी खऱ्या आणि बनावट नोटांमधील फरक ओळखणं आवश्यक आहे.  एसबीआयने या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या नोटांकडे नीट पारखून बघा आणि सुनिश्चित करा की ती नोट खरी आहे खोटी’.

या ट्वीटमध्ये एसबीआयने एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे ग्राहकांना खऱ्या आणि खोट्या नोटांमधील फरक समजू शकतो. आरबीआयने सुद्धा त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत विस्तारीत स्वरूपात माहिती दिली आहे.

2000 च्या खऱ्या आणि बनावट नोटांमधील फरक कसा समजाल?

-2000 च्या नोटेच्या डाव्या बाजुला ‘2000’ लिहिण्यात आलं असेल. ते पाहण्यासाठी तुम्हाला नोट उजेडात धरावी लागेल.

-जेव्हा दोन हजाराची नोट तुम्ही जवळपास 45 डिग्रीच्या अँगलमध्ये पकडाल तेव्हा नोटेच्या डाव्या बाजुला 2000 आकड्यामध्ये लिहिलेलं दिसेल.

-या नोटेमध्ये नवीन फीचर आहे. नोटेवर डाव्या बाजुलाच देवनागरी स्क्रिप्टमध्ये नोटेचं मूल्य असेल.

-नोटेच्या मध्यभागी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पोट्रेट फोटो असेल.

-हे फीचर केवळ माइक्रोस्कोपच्या मदतीनेच पाहता येईल. महात्मा गांधींच्यो फोटोशेजारीच RBI आणि 2000 लिहिलेलं असेल.

-महात्मा गांधींच्या फोटोच्या बाजुला असणारे विंडो थ्रेड निळ्या आणि हिरव्या रंगांमध्ये बदलणारा असेल. नोट वाकडी केल्यास रंगामधील हा बदल दिसून येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2020 02:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading