SBI Home Auction: आज स्वस्तात खरेदी करा घर, गाडी किंवा जमीन; मिळेल तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी

SBI Home Auction: आज स्वस्तात खरेदी करा घर, गाडी किंवा जमीन; मिळेल तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी

SBI Home Auction: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक (State Bank of India) आजपासून घरांचा लिलाव करणार आहे. एसबीआयचा मेगा ई-लिलाव आजपासून सुरू होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 मार्च:  देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (State Bank of India) लिलाव करणार आहे. एसबीआयची मेगा ई-ऑक्शन आज अर्थात 5 मार्च 2021 रोजी सुरू होत आहे. यावेळी असऱ्या लिलावामध्ये तुम्ही रेसिडेन्शिअल, कमर्शिअल प्रॉपर्टी आणि जमिनीव्यतिरिक्त प्लांट, मशिनरी आणि वाहन देखील बोली लावून खरेदी करू शकता. या लिलावात तुम्हाला स्वस्तामध्ये प्रॉपर्टी मिळेल. ही ती प्रॉपर्टी असते जी बँकेच्या डिफॉल्ट लिस्टमध्ये आलेली असते.

बँकेने ट्वीट करून दिली माहिती

स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, याठिकाणी तुम्ही स्वस्तात प्रॉपर्टी, जमीन, प्लांट, मशिनरी, वाहनं आणि बरंच काही खरेदी करू शकता. एसबीआय मेगा ई-ऑक्शनमध्ये सहभागी व्हा आणि सर्वश्रेष्टी बोली लावा.

ज्या संपत्तीचा लिलाव एसबीआय करणार आहे ती देशभरातील विविध भागांमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला गरजेच्या ठिकाणानुसार तुम्ही बोली लावू शकता. या वेबसाइटवर तुम्हाला प्रॉपर्टीसाठी एक रिझर्व्ह प्राइज देखील दिली आहे. लिलावाची ही प्रकिया 5 मार्चपासून सुरू होत आहे.

या क्रमांकावर करू शकता संपर्क

एसबीआयने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.  033-40602403/40067351/40628253/40645316/40645207/40609118 असे क्रमांक आहेत. या क्रमांकावर तुम्ही संपर्क करून माहिती मिळवू शकता.

बँकेच्या मते, या मालमत्ता लीजवरील किंवा फ्रीहोल्ड आहेत, त्यांचे क्षेत्रफळ, ठिकाणी इ. सर्व माहिती सार्वजनिक नोटीसमध्ये दिली जाते. ई-लिलावाच्या सुविधेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर  बँकेत जाऊन या संबंधीची सर्व प्रक्रिया आणि मालमत्तेच्या बाबतीतली सर्व माहिती घेऊ शकता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 5, 2021, 12:10 PM IST

ताज्या बातम्या