आता ATM कार्ड विसरलात तरी काढता येणार पैसे, जाणून घ्या स्टेट बँकेचा नवा उपक्रम

आता ATM कार्ड विसरलात तरी काढता येणार पैसे, जाणून घ्या स्टेट बँकेचा नवा उपक्रम

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेने पैसे काढण्याची नवीन कार्डलेस (Cardless transaction) सुरू केलीय. त्यामुळे तुमच्याजवळ कार्ड नसलं तरी पैसे काढण्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार नाही.

  • Share this:

मुंबई 12 डिसेंबर : डिजिटलायजेशन झाल्यानंतर बँकेने ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या आहेत. बँकेचे व्यवहारही सोपे झाले आहेत. सुरक्षीत आणि सुटसुटीत व्यवहारासाठी बँका आता आणखी नव नवीन गोष्टींची भर टाकत आहेत. आता दररोजच्या व्यवहारात ATM कार्ड ही आवश्यक गोष्ट झालीय. मात्र ATM कार्ड सुरक्षीत ठेवणं आणि सतत सोबत ठेवणं ही एक अडचणीचीही गोष्ट असते. ATM कार्ड (ATM Card)) चोरून त्याचा गैरवापर केल्याच्याही अनेक घटना घडत असतात. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेने पैसे काढण्याची नवीन कार्डलेस (Cardless transaction) सुरू केलीय. त्यामुळे तुमच्याजवळ कार्ड नसलं तरी पैसे काढण्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार नाही. मात्र त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

10 हजारांमध्ये सुरू करा व्यवसाय आणि कमवा महिना 30 हजारांचा नफा

SBIने यासाठी एक खास APP तयार केलंय. त्यासाठी पहिले तुम्हाला SBI YONO हे APP डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर युझर आडी आणि पासर्वड टाकून नव्याने लॉगिंन करावं लागले.

पहिली पायरी - हे APP डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही सहा अंकी पीनकोड सेट करू शकता. APP डाऊनलोड झाल्यावर होम स्किनवर तुम्हाला तीन पर्याय दिसतील. यातला तिसरा पर्याय हा 'योनो कॅश' असेल. त्यानंतर पुन्हा नवे पर्याय दिसतील त्यात 'एटीएम', 'मर्चेंट पीओएस', 'सीएसपी' आणि कार्डलेस शॉपिंग असे पर्याय दिसतील.

दुसरी पायरी - ATMमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला पहिला पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर किती पैसे काढायचे तो आकडा टाकावा लागेल. त्यानंतर सहा आकडी पीनकोड द्यावा लागेल. जो पैसे काढताना टाकणं गरजेचं आहे.

नोकरी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी, आता तुमच्या हातात येऊ शकतो जास्त पगार

तिसरी पायरी - त्यानंतर टर्म आणि कंडिशन मान्य आहे का? असं तुम्हाला विचारलं जाईल त्यानंतर कंन्फर्मवर टीक केलं की त्यानंतर पाच आकडी कॅश ट्रांजेशन नंबर (CSN) मिळेल. त्यानंतर स्टेट बँकेच्या ATM केंद्रावर जावून SBI YONO वर क्लिक केलं की CSN नंबर टाकून पैसे काढता येतील. अशाच प्रकारची सेवा कॅनरा बँकेनेही सुरू केलीय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 03:54 PM IST

ताज्या बातम्या