सुट्टीत बाहेरगावी जाताना 'असं' करा SBI एटीएम कार्ड सुरक्षित

तुम्ही सुट्टीत कुटुंबासोबत कुठे बाहेर जायचा प्लॅन केला असेल तर एटीएम कार्डासाठी या सुरक्षेच्या टिप्स लक्षात ठेवा.

News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2019 12:49 PM IST

सुट्टीत बाहेरगावी जाताना 'असं' करा SBI एटीएम कार्ड सुरक्षित

मुंबई, 08 एप्रिल : देशातली सर्वात मोठी बँक SBI  स्टेट बँक आॅफ इंडियानं ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी पावलं उचललीयत. तुम्ही सुट्टीत कुटुंबासोबत कुठे बाहेर जायचा प्लॅन केला असेल तर या सुरक्षेच्या टिप्स लक्षात ठेवा. तुमच्यासाठी त्या खूप उपयोगी पडतील. आता तुम्ही SBI एटीएम कार्ड जेव्हा वापरत नसाल, तेव्हा तुम्ही ते स्विच आॅफ करू शकता. त्यामुळे बँकेतले तुमचे पैसे सुरक्षित राहतील. जाणून घ्या काय आहेत सेवा?

स्विच आॅफ करण्याची पद्धत : बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरून SMS करा. त्यासाठी तुम्हाला अॅक्टिव्ह आणि डी-अॅक्टिव्ह लिहावं लागेल. असं केल्यानं तुमचं एटीएम कार्ड पूर्ण सुरक्षित राहील.

असा लिहायचा SMS : तुम्हाला पीओएस, एटीएम आणि आंतरराष्ट्रीय, देशात वापरण्यासाठी एटीएमला स्विच आॅन, आॅफ करायचा असेल तर तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड नंबरावरून एक SMS पाठवा.

त्यासाठी तुम्हाला ‘SWON/SWOFFATM/POS/ECOM/INTL/DOM<space> XXXX’ लिहून 09223966666 या नंबरवर   SMS करायला हवा. ( XXXX म्हणजे एटीएम कार्डचे शेवटचे चार नंबर ). उदाहरण पाहा. समजा तुम्हाला पीओएस मशीनवर एटीएम स्विच आॅफ करायचंय, तर तुम्ही SWOFF POS XXXX  लिहून 09223966666 वर SMS करा.

Send an SMS ‘SWON/SWOFFATM/POS/ECOM/INTL/DOM<space> XXXX’ to 09223966666 (XXXX represents last 4 digit of the card number).

Loading...


>> E.g. SWON POS 1234 to activate POS usage


>> SWOFF INTL 1234 to deactivate International usage

एटीएमवरचा व्यवहार बंद करा - तुमची रिक्वेस्ट मान्य केली की तुम्हाला कन्फर्मेशनचा SMS येईल. परदेशी हॅकर्सपासून वाचण्यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्डावरचं आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शन बंद करू शकता. परदेशी जाताना पुन्हा चालू करू शकता.

या जागीही कार्ड चालणार नाही - एकदा का तुम्ही कार्ड स्विच आॅफ केलंत की मग ते कार्ड कुठल्याच मशीनवर चालणार नाही, हे लक्षात ठेवा.


VIDEO : शिवसेना खासदारांनी जात काढल्यावर अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून पलटवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 12:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...