अलर्ट! SBI ग्राहक असाल तर उद्यापर्यंत पूर्ण करा हे काम, नाहीतर खातं होणार फ्रीज

अलर्ट! SBI ग्राहक असाल तर उद्यापर्यंत पूर्ण करा हे काम, नाहीतर खातं होणार फ्रीज

SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. ग्राहकांनी बँकेत आपला KYC तपशील अपडेट केला नाही तर त्यांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं

  • Share this:

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI)सगळ्या बँक खात्यांसाठी KYC तपशील अपडेट करणं सक्तीचं केलं आहे. KYC नसेल तर बँक खातं उघडणं आणि पैसे गुंतवणंही शक्य होत नाही. एवढंच नाही तर हा तपशील दिला नाही तर खात्यामधले बँक व्यवहारही रोखले जाऊ शकतात. तर याच संदर्भात SBI ने आपल्या ग्राहकांना SMS पाठवून अलर्ट पाठवला आहे. यामध्ये ग्राहकांनी आपला KYC तपशील अपडेट केला नाही तर त्यांचं खातं उद्यापासून म्हणजेच 28 फेब्रुवारीला बंद केलं जाईल, असं या अलर्टमध्ये म्हटलं होतं.

KYC म्हणजे काय?

KYC अर्थात Know Your Customer म्हणजेच आपल्या ग्राहकांबाबत पूर्ण माहिती असणे. केवायसी करणं जरूरी आहे कारण त्यामुळे बँक आणि ग्राहकांमधील व्यवहार सुलभ होतात. KYC अपडेट करण्याकरता ग्राहकांना आपल्या जवळच्या SBI शाखेमध्ये जाऊन अद्ययावत कागदपत्रं द्यावी लागतील.

(हेही वाचा-1 मार्चपासून बदलणार बँक आणि ATM चे हे 5 नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम)

नाहीतर भविष्यात ग्राहकांचे बँकेचे व्यवहार रोखण्यात येतील. ग्राहकांची खाती देखील बँकेकडून फ्रीज केली जातील.

KYC साठी ही कागदपत्रं गरजेची

SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, KYC साठी ग्राहकांना आपलं ओळखपत्रं द्यावं लागेल. यामध्ये पासपोर्ट, व्होटर आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, नरेगा कार्ड, पेन्शन, पोस्ट ऑफिसची कागदपत्रं अशा कागदपत्रांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचं बँक खातं असेल तर त्यांच्या काळजीवाहू पालकांचं ओळखपत्र आणि पत्त्याचं प्रमाणपत्र सादर करता येईल.

SBI च्या वेबसाइटवर माहिती

SBIच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार केवायसीसाठी द्याव्या लागणाऱ्या कागदपत्रांवर तोच पत्ता असणं अनिवार्य आहे जो बँकेतील खात्यासाठी भरलेल्या फॉर्म असेल. त्यामुळे SBI कडून पाठवण्यात आलेला Alert SMS ग्राहकांना अत्यंत गांभीर्याने वाचणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2020 01:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading