SBI ग्राहकांनो लक्ष असू द्या! घरबसल्या कमी करता येणार EMI, असं करा Loan restructuring

SBI ग्राहकांनो लक्ष असू द्या! घरबसल्या कमी करता येणार EMI, असं करा Loan restructuring

कोव्हिड-19 प्रभावातून बँकेच्या किरकोळ कर्जदारांना दिलासा देणे हा त्याचा हेतू आहे. SBI loan restructuring साठी एसबीआयने सोमवारी ऑनलाइन पोर्टल सुरू केले.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सूचनेनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) loan restructuring धोरण आणले आहे. कोव्हिड-19 प्रभावातून बँकेच्या किरकोळ कर्जदारांना दिलासा देणे हा त्याचा हेतू आहे. SBI loan restructuring साठी एसबीआयने सोमवारी ऑनलाइन पोर्टल सुरू केले. बँकेच्या पोर्टल https://bank.sbi/ किंवा https://sbi.co.in या वेबसाइटवरून ग्राहकांना घरबसल्या माहिती मिळेल की होम लोन किंना ऑटो लोनचे रिस्ट्रक्चर होऊ शकते की नाही.

वाचा-SBI loan restructuring : घरबसल्या एका क्लिकवर ओळखा तुम्ही पात्र आहात की नाही?

रिस्ट्रक्चरसाठी उत्पन्नाचा तपशील द्यावा लागेल

या पोर्टलच्या माध्यमातून गृहकर्ज, वाहन कर्जासारख्या किरकोळ कर्जाचे रिस्ट्रक्चर सहज केले जाईल, असे SBI ने म्हटले आहे. ग्राहकांना कर्जाच्या रिस्ट्रक्चर पात्रतेबद्दल माहिती मिळवण्यासाठी केवळ त्यांच्या उत्पन्नाचा तपशील द्यावा लागेल. आरबीआयच्या loan restructuring फ्रेमवर्क अंतर्गत, ज्यांचे कर्ज खाते स्टॅंडर्ड श्रेणीत येते ते कर्ज रिस्ट्रक्चरसाठी पात्र आहेत. यामध्ये ते ग्राहक येतील, ज्यांनी 1 मार्च 2020 पर्यंत 30 दिवस किंवा त्याहून अधिक दिवसांच्या कर्जाच्या पेमेंटमध्ये डिफॉल्ट नाही आहेत. तसेच ज्यांचे उत्पन्न कोरोना संकटावर परिणाम झाले आहे ते देखील यात येतील.

वाचा-पैसे पाठवण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून भरावा लागणार कर, वाचा काय आहेत नवे नियम

पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ शकते रिक्वेस्ट

स्टेट बँकेच्या या पोर्टलच्या माध्यमातून ग्राहक त्यांच्या कर्जाच्या मोरेटोरियमसाठी (Moratorium) विनंती करू शकतात. याअंतर्गत, एक महिन्यापासून 24 महिन्यांसाठी Moratoriumस्थगितीची विनंती केली जाऊ शकते. एवढेच नाही तर ग्राहक या पोर्टलद्वारे कर्ज दुरुस्तीचा कालावधी वाढविण्याची विनंती देखील करु शकतात. आरबीआयने बँकांना त्यांच्या वैयक्तिक ग्राहकांना कर्ज रिस्ट्रक्चरचा पर्याय देण्यास परवानगी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांना 15 सप्टेंबर 2020 पर्यंत कर्ज रिस्ट्रक्चरसाठी योजना सुरू करण्यास सांगितले होते.

वाचा-SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! UPI ने पैसे ट्रान्सफर करत असाल सावधान

असं करा रिस्ट्रक्चचरिंग

>> पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर एसबीआयच्या रिटेल ग्राहकांना खाते क्रमांक टाकावे लागेल.

>> OTT validation पूर्ण झाल्यानंतर आणि काही महत्वाची माहिती घातल्यानंतर ग्राहकास कर्जाची रिस्ट्रक्चचरिंग करण्याची आपली पात्रता जाणून घेता येईल. त्याला एक संदर्भ क्रमांकही मिळेल.

>> संदर्भ क्रमांक 30 दिवसांसाठी वैध असेल. यावेळी ग्राहक आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बँक शाखेत भेट देऊ शकतात.

>> loan restructuring कागदपत्रांची पडताळणी व कागदपत्रांची अंमलबजावणी झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.

Published by: Priyanka Gawde
First published: September 21, 2020, 10:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading