SBI च्या ग्राहकांची फसवणूक, बँकेनं दिलेल्या सुचनेकडं दुर्लक्ष करू नका

SBI च्या ग्राहकांची फसवणूक, बँकेनं दिलेल्या सुचनेकडं दुर्लक्ष करू नका

एसबीआयच्या ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रकार वाढले असून बँकेनं अशी फसवणूक झाल्यास काय करायचं आणि काय करू नये हे सांगितलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे. बँकेच्या ग्राहकांची ऑनलाइन फसवणुक होण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या आठवड्यात अनेकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली होती. बँकेनं याआधीही त्यांच्या सर्व ग्राहकांना सुचना दिली होती.

पुन्हा एकदा 42 कोटी ग्राहकांना अलर्ट केलं आहे. एसबीआयने सांगितलं आहे की, ग्राहकांनी कोणाशीही तुमच्या कार्डची माहिती इतरांना देऊ नका. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेसुद्धा सांगितलं आहे की, तुमच्या बँक खात्याशी संबंधित माहितीची सुरक्षा तुमच्याच हातात आहे.

एसबीआयने केलं ट्विट

तुमच्या बँकेच्या खात्याची डिटेल्स, पासवर्ड, पिन, ओटीपी, सीव्हीव्ही, युपीआय-पिन इत्यादी माहिती फक्त स्वत:कडेच ठेवा. इतर कोणालाही देऊ नका. जागृत व्हा आणि सावध रहा असं ट्विट एसबीआयने केलं आहे.

याशिवाय आणखी एक ट्विट करत एसबीआयने सांगितलं की, तुमच्या बँक खात्यात काही गड़बड झाल्याचं लक्षात अलं तर लगेच बँकेला कल्पना द्या. तुमच्याकडून लवकर माहिती मिळाल्यास बँकेकडून लगेच कार्यवाही करता येईल. तुमच्या नकळत खात्यावरून पैसे काढल्याचा मेसेज आल्यास त्वरीत बँकेला कळवा.

हा मेसेज रिकामं करतो तुमचं खातं

एसबीआयने नुकतंच त्यांच्या ग्राहकांना इन्कम टॅक्स रिफंडच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीबद्दल सावध केलं होतं. टॅक्सच्या नावावर होणाऱ्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी एसबीआयने सांगितलं की, अशा प्रकारच्या कोणत्याही मेसेजवर क्लिक करू नका ज्या ठिकाणी तुम्हाला टॅक्स रिफंडच्या रिक्वेस्टबद्दल विचारलं जाईल.

गेल्या महिन्यापासून एसबीआयच्या अनेक ग्राहकांना असे मेसेज येत आहेत. ज्यामध्ये सांगितलं जात आहे की, देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या इन्कम टॅक्स रिफंडबद्दल माहिती मिळते असं म्हटलेलं असतं.

VIDEO :..जर फडणवीसांनी बहुमत सिद्ध केलं नाही? जयंत पाटलांनी वर्तवला पुढचा अंदाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: moneySBI
First Published: Nov 10, 2019 02:12 PM IST

ताज्या बातम्या