Home /News /money /

ना कागदपत्रांची गरज, ना बँकेत जाण्याची; घरबसल्याच उघडा बँक अकाऊंट

ना कागदपत्रांची गरज, ना बँकेत जाण्याची; घरबसल्याच उघडा बँक अकाऊंट

घरी बसूनच अवघ्या चार मिनिटांत तुम्हाला बँक अकाऊंट (Bank account) उघडता येईल.

नवी दिल्ली, 18 मार्च : बँकेत बचत खातं (Savings Account) सुरू करायचं म्हटलं तर एकतर बँकेत जावं लागतं आणि दुसरं म्हणजे कागदपत्रंही द्यावी लागतात. पण आता तुम्हाला या दोन्ही गोष्टींची गरज नाही. कोणत्याही कागदपत्रांशिवाय घरबसल्याच तुम्ही बँक अकाऊंट उघडू शकता.  देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँकेनं (State Bank Of India) आता बँकेत खातं उघडणं सोपं करून टाकलं आहे. स्टेट बँकेनं यासाठी इन्स्टा बचत खातं (Insta Savings Account Service) सुविधा सुरू केली आहे. ही आधारकार्ड (Aadhar Card) निगडीत डिजिटल सेवा असून, याद्वारे ग्राहक बँकिंग आणि लाईफस्टाईल प्लॅटफॉर्म ‘योनो’च्या (YONO) मदतीनं बचत खातं उघडू शकतात. घरबसल्या अवघ्या चार मिनिटांत आता हे काम करता येणार आहे. एसबीआय इन्स्टा सेव्हिंग्ज बँक खातेधारकांना 24 × 7 सेवा उपलब्ध असते. सर्व नवीन खातेदारांना रुपे एटीएम-कम-डेबिट कार्ड (Rupay ATM cum Debit Card) मिळेल. खात्यात किमान शिल्लक नसेल तर बँक त्यावर कोणतेही शुल्क आकारणार नाही. एसबीआय इन्स्टा सेव्हिंग बँक खातेधारकांना 24 तास अखंड बँकिंग सुविधा उपलब्ध असेल. इन्स्टा खातं उघडण्यासाठी खालील टप्प्यांचा वापर करा .. - एसबीआय इन्स्टा सेव्हिंग्ज खातं उघडण्यासाठी ग्राहकांना प्रथम ‘योनो’ अॅप डाउनलोड करावं लागेल. - यानंतर आपल्या पॅन आणि आधारकार्डची माहिती भरा. ओटीपी सबमिट करा आणि इतर आवश्यक माहिती भरा. - एसबीआय इन्स्टा सेव्हिंग्ज खातेदारांसाठी नामनिर्देशन सुविधादेखील उपलब्ध आहे. - एसएमएस अलर्ट आणि एसबीआय क्विक मिस्ड कॉल सर्व्हिसद्वारे नामनिर्देशन करता येतं. - ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खातेधारकाचे खाते त्वरित सुरू होईल आणि तो व्यवहारदेखील सुरू करू शकेल. - ग्राहक पूर्ण केवायसी पूर्ण करण्यासाठी वर्षभराच्या कालवधीत केव्हाही जवळच्या बँक शाखेत जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करू शकतात. हे वाचा: Gold Rate: लग्नसराईच्या काळात पुन्हा वाढले सोन्याचे दर, सलग 3 दिवस होतेय वाढ आजकाल अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायान बँकिंग सेवाही डिजिटल झाली आहे. अगदी मोबाइलद्वारेही आपण बँकेची बहुतांश कामं पूर्ण करू शकतो. ग्राहकांनी बँक शाखेत गर्दी न करता घरी राहून बँक सेवेचा लाभ घ्यावा या उद्देशानं बँकिंग व्यवस्थेत अत्याधुनिक सुविधांचा वापर वाढवण्यात येत आहे. आताच्या काळात तर या आधुनिक बँक सेवेचा प्रचंड उपयोग झाला आहे. खासगी बँकांच्या स्पर्धेतही सरकारी बँकां ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करणे शक्य झालं आहे. स्टेट बँकेसारख्या प्रचंड विस्तार असणाऱ्या बँकेनं आपल्या ग्राहकांना सर्व अत्याधुनिक सेवा दिल्या आहेत. तसंच बँक नवनवीन अत्याधुनिक सेवा देण्यातही आघाडीवर आहे. त्याचेच हे एक पुढचे पाऊल आहे.
First published:

Tags: Bank, Digital services, Money

पुढील बातम्या