• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • फक्त 100 रुपयात सुरु करा Post Office RD योजना, गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय

फक्त 100 रुपयात सुरु करा Post Office RD योजना, गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय

पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये (Post Office RD Scheme) कोणतीही प्रौढ व्यक्ती आपले खाते उघडू शकते. या योजनेत संयुक्त खातेही उघडता येते.

  • Share this:
    मुंबई, 16 नोव्हेंबर : आपल्या खर्चाचे योग्य प्लानिंग करण्यासाठी बचत (Saving For Future) करणे फार महत्वाचे आहे. बचत करून, येणाऱ्या काळात आपल्या महत्त्वपूर्ण गरजा पूर्ण करणे खूप सोपे होते. जर तुम्ही तुमचे बचतीचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले तर तुम्ही त्यावरही कमाई करू शकता. रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) हा बचतीचे पैसे गुंतवण्याचा सुरक्षित गुंतवणूक पर्याय (Investment Options) म्हणून ओळखला जातो आणि जर तुम्हाला RD मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिस RD योजनेअंतर्गत, तुम्ही दरमहा केवळ 100 रुपये भरु शकता. तुम्ही येथून गुंतवणूक सुरू करू शकता. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार, सध्या पोस्ट ऑफिस RD वर 5.8 टक्के वार्षिक व्याजाचा लाभ उपलब्ध आहे. RD वर मिळणाऱ्या व्याजावरही कर भरावा लागतो. या योजनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे RD मधील व्याजदर तीन महिन्यांसाठी चक्रवाढ आहे. कोण खाते उघडू शकतो? पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये (Post Office RD Scheme) कोणतीही प्रौढ व्यक्ती आपले खाते उघडू शकते. या योजनेत संयुक्त खातेही उघडता येते. अल्पवयीन व्यक्तीचे खाते पालकाच्या वतीने देखील उघडले जाऊ शकते. या योजनेत तुम्हाला हवी तेवढी खाती उघडता येतील. PM KISAN मध्येही होतोय घोटाळा! 'या' शेतकऱ्यांकडून सरकार वसूल करणार पैसे कर्ज सुविधेचा लाभ तुम्हाला पोस्ट ऑफिस आरडी योजनेद्वारे कर्ज घेण्याच्या सुविधेचा लाभ देखील मिळतो. जर तुम्ही या योजनेअंतर्गत तुमचे 12 हप्ते जमा केले असतील तर तुम्ही या अंतर्गत कर्ज घेऊ शकता. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, तुमच्या खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 50 टक्के कर्ज घेतले जाऊ शकते. Digital Gold बाबत मोठ्या निर्णयाच्या विचारात सरकार, SEBI आणि RBI आखत आहेत योजना पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला दरमहा किमान 100 रुपये जमा करावे लागतील. जर तुमचे खाते महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत उघडले तर तुम्हाला 15 तारखेच्या आत पैसे जमा करावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्ही महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांनंतर तुमचे खाते उघडले असेल, तर तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या तारखेआधी पैसे जमा करावे लागतील.
    Published by:Pravin Wakchoure
    First published: