• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Business Idea: अवघ्या 5 हजारांत सुरू करता येऊ शकतो ‘हा’ व्यवसाय; एक महिन्यानंतर होईल मोठा फायदा

Business Idea: अवघ्या 5 हजारांत सुरू करता येऊ शकतो ‘हा’ व्यवसाय; एक महिन्यानंतर होईल मोठा फायदा

आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल (How to start business in low cost) सांगत आहोत.

  • Share this:
    कोरोनाचा (Corona) काळ अनेकांसाठी कठीण गेला. लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांचे व्यवसाय (business) बुडाले. या काळात नवीन काही तरी करण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. कमी भांडवलात व्यवसाय करण्याकडे बऱ्याच जणांचा कल आहे. अशा कठीण काळात नवीन व्यवसाय (How to start business) सुरू करून तुमचा संसाराचा गाडा सुरू राहू शकतो. तुम्ही असा व्यवसाय शोधत असाल, जिथं कमी खर्च असेल आणि तुम्ही घरी बसून चांगले पैसे कमवू शकता. आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल (How to start business in low cost) सांगत आहोत. घरातल्या महिलाही (Housewives) हा व्यवसाय चालवू शकतात. त्यांच्याकडे मोकळा वेळ असेल तर वेळेचा योग्य वापर केला जाईल आणि भरपूर पैसेदेखील मिळतील. कमी खर्चाचा आणि जास्त मेहनत नसलेला हा व्यवसाय आहे गिफ्ट बास्केट (gift baskets) बनवण्याचा. सध्या बहुतेकांना आपल्या जवळच्यांना भेटवस्तू म्हणून गिफ्ट बास्केट देणं आवडतं. गिफ्ट बास्केट (gift baskets) खरेदी करण्यासाठी ते जास्त घासाघीसही करत नाहीत. तुम्हाला सजावटीचं काम करायला आवडत असेल, तर तुम्ही या व्यवसायाद्वारे चांगले पैसे कमावू शकता. गिफ्ट बास्केट व्यवसायात अनेक प्रकारच्या भेटवस्तू देण्यासाठी एक बास्केट (टोपली) बनवलं जातं. या बास्केटमध्ये भेटवस्तू चांगल्या प्रकारे पॅक करून दिल्या जातात. हे बास्केट तुम्ही घरी बनवू शकता. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या किंमतीच्या बास्केट तयार करू शकता. आजच्या काळात अनेक कंपन्यांनी गिफ्ट बास्केट बनवण्यास सुरुवात केली आहे. हे वाचा- GOOD NEWS! आर्थिक सुधारणांचा वेग कोरोनापूर्व काळाएवढा काळानुसार गिफ्ट पॅकिंगच्या क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. बाजारात गिफ्ट बास्केटची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. वाढदिवस, वर्धापनदिन आणि इतर शुभ प्रसंगी गिफ्ट बास्केटची मागणी मुख्यतः शहरी भागात वाढत आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला गिफ्ट बास्केट किंवा बॉक्स रिबनची आवश्यकता भासेल. रॅपिंग पेपर, हस्तकलेचं साहित्य, सजावटीचं साहित्य, दागिन्यांचे तुकडे, पॅकेजिंग साहित्य, स्टिकर्स, फॅब्रिकचे तुकडे, पातळ वायर, वायर कटर, मार्कर पेन, पेपर श्रेडर, कार्टन स्टेपलर, गोंद आणि कलरिंग टेप आदी सामानही लागेल. गिफ्ट बास्केटच्या व्यवसायात तुम्हाला खूप कमी गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही ते 5 हजार ते 8 हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून हा व्यवसाय सुरू करू शकता. गिफ्ट बास्केटच्या व्यवसायाचं मार्केटिंगही सोपं आहे. मार्केटिंगसाठी एक सँपल गिफ्ट तयार करा. ते आपल्या जवळच्या बाजारातल्या मोठ्या दुकानदारांना सँपल म्हणून दाखवा. तुम्ही सँपल गिफ्ट वेबसाइटवरही अपलोड करू शकता आणि गिफ्ट बास्केट ऑनलाइन विकू शकता. तुम्ही तुमच्या गिफ्ट बास्केटची किंमत थोडी कमी ठेवली तर ती सहजपणे विकली जातील. सध्याच्या कोरोना काळात तुमचीही नोकरी गेली असेल, तर तुम्ही ह्या व्यवसायाचा विचार करू शकता. कमीत कमी भांडवलातला हा व्यवसाय तुमचं कुटुंब चालवू शकेल
    First published: