मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कमाईसाठी 'हे' 10 व्यवसाय आहेत बेस्ट, महिन्याला मिळतील लाखो रुपये

कमाईसाठी 'हे' 10 व्यवसाय आहेत बेस्ट, महिन्याला मिळतील लाखो रुपये

कोरोनाच्या या संकटकाळात (Corona Pandemic) अनेक जणांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता.

कोरोनाच्या या संकटकाळात (Corona Pandemic) अनेक जणांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता.

कोरोनाच्या या संकटकाळात (Corona Pandemic) अनेक जणांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 08 डिसेंबर: कोरोनाच्या या संकटकाळात (Corona Pandemic) अनेक जणांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला असे 10 व्यवसाय (Businesses) सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक ट्रेनिंग (Business Training) घेण्याची गरज नसून या व्यवसायासाठी तुम्हाला सरकारी अनुदान देखील मिळू शकते.

1) दुग्ध व्यवसाय (Dairy)

हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून देणारा आहे. एक गाय तुम्ही कमीतकमी 30 हजार रुपयांत तर म्हैस 50 ते 60 हजारांमध्ये खरेदी करू शकता. एक गाय किंवा म्हशीच्या माध्यामातून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही हे दूध, दूध कंपन्यांना किंवा थेट ग्राहकांना विकून उत्तम नफा मिळवू शकता.

2) फुलांचा व्यवसाय (Flower Vendor)

सणासुदीच्या दिवसांत आणि दररोज देखील फुलांना मोठी मागणी असते. तुम्ही भाडेतत्त्वावर जमीन घेऊन किंवा स्वतःच्या शेतीत देखील हा व्यवसाय सुरु करू शकता. तुमच्या शेतीमध्ये तुम्ही गुलाब, सूर्यफूल, झेंडू यांसारख्या फुलांचे उत्पादन घेऊ शकता. ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून देखील तुम्ही या फुलांची विक्री करू शकता.

(हे वाचा-कोट्यवधी कर्जदारांना मिळणार दिलासा? SCच्या सुनावणीवर सगळ्यांचे लक्ष)

3) झाडांचा व्यवसाय (Nursery)

तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही सागवान, शिसमसारख्या झाडांची लागवड करून उत्तम व्यवसाय करू शकता. व्यावसायिक पद्धतीने केलेल्या लागवडीतून तुम्ही पुढील 10 वर्षांमध्ये लाखो रुपयांची कमाई करू शकता. एका शिसमच्या झाडाची किंमत ही जवळपास 40 हजार रुपये असू शकते. त्याचबरोबर सागवानदेखील तितकेच महाग असते. त्यामुळे याच्या लागवडीतून देखील तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता.

4) मधमाशी पालन ( Honey bee Farm Business)

मधमाशी पालन हा खूप जुना व्यवसाय आहे. या माध्यमातून देखील तुम्ही लाखोंची उलाढाल करू शकता. 1 किंवा दीड लाख रुपयांच्या मदतीने तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. परंतु या व्यवसायासाठी तुम्हाला अधिकृत व्यावसायिक ट्रेनिंग (official Training) घ्यावी लागणार आहे.

5) भाज्यांची शेती (Vegetable Production)

भाज्यांना देखील दररोज मागणी आहे. सध्या गहू आणि तांदळाची शेती करणे सर्व शेतकऱ्यांसाठी शक्य नाही. कमीतकमी जागेत देखील तुम्ही हा व्यवसाय करू शकता. हरियाणामधील घरौंदा याठिकाणी असेच एक सेंटर तयार करण्यात आले आहे. तुम्हाला मिरची, कोबी आणि टोमॅटो सारख्या भाज्या मुबलक प्रमाणात घेता येऊ शकतात.

(हे वाचा-'पेट्रोलची किंमत 40 रुपये लीटर करावी', भाजप नेत्यानेच केली मागणी)

6) कुक्कुटपालन (Poultry)

हा व्यवसाय देखील लाखोंची कमाई करून देणारा व्यवसाय आहे. यासाठी तुम्हाला थोड्या जास्त गुंतवणुकीची गरज आहे. केंद्र सरकारच्या मुद्रा लोनच्या माध्यमातून तुम्ही यासाठी मदत मिळवू शकता. व्यावसायाच्या सुरुवातीला तुम्ही 15 ते 20 टक्के नफा मिळवू शकता.

7) बांबूची शेती (Bamboo Production)

बांबूचा (bamboo) वापर हा खूप कामांसाठी होतो. टेबल आणि झोपडीवजा घर बनवण्यासाठी देखील बांबूचा वापर होतो. बांबूच्या शेतीमध्ये एका झाडापासून 5 क्विंटल बांबूचे(bamboo business) उत्पन्न मिळाले तर 100 झाडांपासून 500 क्विंटल उत्पन्न मिळू शकते. सध्या 500 क्विंटल बाबू विक्रीतून शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवू शकतो.

8) मत्स्य पालन (Fish Farming)

या व्यवसायातून मोठा नफा मिळवू शकता. खूप कमी जागेत देखील तुम्ही मत्स्य व्यवसाय सुरु शकता. मत्स्य व्यवसायासाठी घेतलेल्या खड्ड्याची माती विकून देखील तुम्ही पैसे मिळवू शकता. त्यानंतर या खड्डयामध्ये मत्स्यपालन करून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता.

9)कोरफडीची शेती (Aloevera Farming)

कोरफडीची शेती देखील खूप फायदेशीर आहे. एक बिघा (साधारणपणे 1.6 एकर) जामिनीवर 2500 रोपं लावण्यासाठी 5 ते 6 हजार रुपयांचा खर्च येतो. या झाडांसाठी रासायनिक खते आणि इतर औषधांचा देखील फारसा वापर करावा लागत नाही. वर्षातून चार ते पाच वेळा पाणी आणि कोणत्याही हवामानात यावर काहीही परिणाम होत नाही. कोरफडीची झाडे डेरेदार झाडांबरोबर देखील लावू शकतो. वर्षभरात दोनदा याची काढणी करून तुम्ही वर्षाला एक बिघा जमिनीतून 15 ते 20 हजार रुपयांचे उत्पन्न घेऊ शकता.

10) तुळशीची शेती (Tulsi Farming)

बाबा रामदेव यांच्या पतंजलीबरोबरच अनेक औषध कंपन्यांना औषध निर्मितीसाठी तुळशीची गरज असते. तुळशीची शेती करून 10 बिघा जमिनीमध्ये देखील शेतकरी 15 हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीने 3 लाखांपर्यंत कमाई करू शकतात.

First published:

Tags: Business News, Money, Small business