मराठी बातम्या /बातम्या /मनी /50 हजारात सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखाची कमाई; वाचा सविस्तर

50 हजारात सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखाची कमाई; वाचा सविस्तर

अवघ्या 50 हजारांची गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू शकता. या व्यवसायात जम बसल्यानंतर तुम्ही दिवसाला 4 हजार म्हणजेच महिन्याला लाख रुपये कमावू शकता.

अवघ्या 50 हजारांची गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू शकता. या व्यवसायात जम बसल्यानंतर तुम्ही दिवसाला 4 हजार म्हणजेच महिन्याला लाख रुपये कमावू शकता.

अवघ्या 50 हजारांची गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू शकता. या व्यवसायात जम बसल्यानंतर तुम्ही दिवसाला 4 हजार म्हणजेच महिन्याला लाख रुपये कमावू शकता.

नवी दिल्ली, 30 मे: कोरोना साथीच्या काळात (Coronavirus Pandemic) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळं अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय (Business) करून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसंच काहींना नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याची इच्छा असते. पण कोणता व्यवसाय करावा हे समजत नसतं. भांडवलाची मर्यादा असते. अशा लोकांसाठी एका उत्तम व्यवसाय उपलब्ध आहे. यामध्ये भांडवलही कमी लागते आणि नफाही भरपूर होतो. अवघ्या 50 हजारांची गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू शकता. या व्यवसायात जम बसल्यानंतर तुम्ही दिवसाला 4 हजार म्हणजेच महिन्याला लाख रुपये कमवू (earn 1 lakh rupee per month) शकता.हा व्यवसाय आहे केळ्यांचे चिप्स (Banana Chips) बनवण्याचा.

केळ्याचे चिप्स हे आरोग्यासाठीही (Health) चांगले असतात. इतकंच नाही तर उपवासालाही केळ्याचे चिप्स खाल्ले जातात. केळ्यांच्या चिप्सला  मोठी मागणी असते. त्यामुळे त्याची विक्रीही चांगली होते. केळ्याच्या चिप्सची बाजारपेठ (Market) लहान असल्यानं मोठ्या ब्रँडेड कंपन्या या व्यवसायाकडे वळत नाहीत. त्यामुळे या व्यवसायात चांगली संधी उपलब्ध आहे.

हे वाचा-केवळ 5000 रुपये गुंतवून करा मोठी कमाई! आजपासून गुंतवणुकीसाठी नवा पर्याय

केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी विविध प्रकारच्या यंत्रांचा (Machines) वापर केला जातो. कच्चा मालासाठी कच्ची केळी, मीठ, तेल आणि अन्य मसाल्यांचा उपयोग केला जातो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही उपकरणांची गरज आहे.

- केळी धुण्यासाठी टँक आणि केळी सोलण्याचे यंत्र

- केळ्यांचे पातळ काप करण्याचे यंत्र

- हे काप तळण्याचे यंत्र

- मसाले लावण्याचे यंत्र

- पाऊच प्रिटिंग मशीन

- प्रयोगशाळा उपकरणं

ही यंत्रसामुग्री कुठून खरेदी कराल 

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी आवश्यक यंत्रसामुग्री, उपकरणं तुम्ही https://www.indiamart.com/ किंवा https://india.alibaba.com/index.html या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला 28 ते 50 हजार रुपये लागतील. ही यंत्रसामुग्री ठेवण्यासाठी तुमच्याकडे साधारण 4 ते 5 हजार चौरस फूट जागेची गरज आहे.

हे वाचा-सोनेविक्रीच्या नियमाबाबत मोठा निर्णय! तुमच्या सोन्याच्या दागिन्यांवर काय परिणाम?

50 किलो चिप्स तयार करण्यासाठी येणारा खर्च

केळ्याचे 50 किलो चिप्स तयार करण्यासाठी कमीतकमी 120 किलो कच्ची केळी (Raw Banana) लागतील. त्याचा खर्च साधारण हजार रुपये येतो. एवढे चिप्स तळण्यासाठी 12 ते 15 लिटर खाद्यतेलाची (Edible Oil) गरज आहे. त्यासाठी 120 रुपये किलो दरानं 1800 रुपये लागतील. चिप्स तळण्याच्या यंत्रासाठी एका तासाला 10 ते 11 लिटर डिझेल (Diesel) लागते. एक लिटर डिझेलची किंमत 90 रुपये धरली तर 11 लिटरचे 990 रुपये होतात. मीठ (Salt) आणि मसाले (Spices) यांचा खर्च साधारण 200 रुपये होईल. म्हणजेच साधारण चार हजार रुपयांमध्ये 50 किलो चिप्स तयार होतील. तुम्हाला केळ्याच्या चिप्सच्या एक किलोच्या एका पॅकेटची किंमत पॅकिंगच्या खर्चासह साधारण 80 रुपये पडेल. तुम्ही ऑनलाइन किंवा किराणा दुकानात 100 ते 150 रुपये किलो या दराने ते सहज विकू शकता.

एक लाख रुपयांचा नफा कसा कमवू शकता

या हिशोबाने एक किलोमागे 10 रुपयांचा नफा धरला तर दिवसाला 4 हजार रुपयांचा नफा (Profit) सहज कमवू शकतो. तुमची कंपनी एका महिन्यात 25 दिवस काम करत असेल तर एका महिन्यात तुम्ही अगदी सहज एक लाख रुपये कमवू शकता.

First published:

Tags: Business News, Investment, Money, Small business