• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • ‘हा’ व्यवसाय सुरू करून महिन्याला कमवा किमान 1 लाख रुपये नफा; सरकार देईल 35 टक्के अनुदान

‘हा’ व्यवसाय सुरू करून महिन्याला कमवा किमान 1 लाख रुपये नफा; सरकार देईल 35 टक्के अनुदान

पोल्ट्री फार्मचा (Poultry Farm) व्यवसाय अगदी छोट्या प्रमाणात सुरू केलात तरीदेखील यातून दरमहा हमखास किमान एक लाख रुपयांची कमाई होऊ शकेल

  • Share this:
नवी दिल्ली 09 सप्टेंबर : सध्याच्या काळात नोकऱ्या (Jobs) मिळणं कठीण झालं आहे. अशावेळी नोकरीऐवजी व्यवसाय (Business) करण्याचा पर्याय स्वीकारण्याची तयारी असेल तर एक असा व्यवसाय आहे ज्यात तुम्हाला हमखास फायद्याची हमी आहे. कृषी क्षेत्राशी (Agriculture) निगडित हा व्यवसाय आहे, कुक्कुटपालनाचा अर्थात पोल्ट्री फार्मचा (Poultry Farm) व्यवसाय. अगदी छोट्या प्रमाणात हा व्यवसाय सुरू केलात तरीदेखील यातून दरमहा हमखास किमान एक लाख रुपयांची कमाई होऊ शकेल. जाणून घेऊया या व्यवसायाबाबत सविस्तर माहिती. तुम्हाला लहान प्रमाणात हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर साधारण 1500 कोंबड्यांपासून सुरू करता येईल. छोट्या पोल्ट्री फार्मसाठी (Poultry Farm) किमान 50 हजार ते 1.5 लाख रुपयांपर्यंत खर्च येईल. मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करायचा असेल तर 1.5 ते 3.5 लाख रुपये खर्च येईल. यासाठी बँका, वित्तीय संस्था कर्ज (Loan) देण्यास तयार असतात. त्यांच्याकडून व्यावसायिक कर्ज घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. सरकारही यासाठी मदत करतं. आपोआपच हलू लागली खुर्ची; CCTV फुटेज तपासताच महिलेला बसला धक्का, VIDEO सरकार देतं 35 टक्के अनुदान पोल्ट्री फार्म व्यवसाय कर्जासाठी सरकारकडून (Government) 25 टक्के अनुदान (Subsidy) दिलं जातं. एससी-एसटी (SC/ST) वर्गाला 35 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकतं. या व्यवसायासाठी बँका, वित्तीय संस्था अगदी सहजपणे जास्तीत जास्त कर्ज देतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडील अगदी कमी रक्कम गुंतवून हा व्यवसाय सुरू करता येतो. असं करा या व्यवसायाचं नियोजन या व्यवसायात उतरण्यापूर्वी, योग्य प्रशिक्षण (Training) घेणं महत्त्वाचं आहे. कारण यात कोंबड्या व्यवस्थित ठेवणं, त्यांचं खाणं-पिणं, स्वच्छता, अंडी योग्य पद्धतीनं ठेवणं, त्यांच्या विक्रीचे नियोजन आदी अनेक बाबी काळजीपूर्वक करणं आवश्यक असतं. तुम्हाला 1500 कोंबड्यांपासून सुरुवात करायची असेल तर किमान 10 टक्के अधिक पिल्लं खरेदी करावी लागतील. कारण अनेकदा रोगांमुळे एकावेळी अनेक कोंबड्या मरतात. असे धोके लक्षात घेऊन नियोजन करणं महत्त्वाचं असतं. अंड्यांमधून होईल मोठी कमाई देशात सध्याच्या काळात अंडी (Eggs), कोंबडी (Chicken) यांची मागणी वाढत आहे. त्यामुळे अंड्यांच्या तसंच कोंबड्यांची किंमतही वाढत आहे. ऑक्टोबर 2020 च्या सुरुवातीपासून 7 रुपयांना एक अंडं असा दर आहे. त्यामुळे कोंबडीचं महत्त्व वाढलं आहे. VIDEO: नशेत मॉडेलचा धिंगाणा; सैन्याची जिप्सी अडवून जवानाला धक्काबुक्की कोंबडी खरेदीचं बजेट 50 हजार रुपये एका लेयर पॅरेंट कोंबडीची किंमत सुमारे 30 ते 35 रुपये आहे. म्हणजेच 1500 कोंबड्या खरेदी करण्यासाठी किमान 50 हजार रुपयांची गरज आहे. कोंबड्यांची पिल्लं घेतल्यानंतर त्यांना वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं अन्न द्यावं लागतं. आजारी पडू नयेत यासाठी औषधांवरही खर्च करावा लागतो. या सगळ्याकरता साधारण 20 आठवड्यांच्या कालावधीसाठी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. 20 आठवड्यांनंतर, कोंबडी अंडी घालण्यास सुरुवात करते आणि एक वर्ष अंडी देते. एका वर्षात एक कोंबडी सुमारे 300 अंडी देते. वर्षाला 14 लाखांपेक्षा जास्त नफा एका कोंबडीकडून दरवर्षी सरासरी 290 अंडी याप्रमाणे 1500 कोंबड्यांकडून सुमारे 4 लाख 35 हजार अंडी मिळतात. काही प्रमाणात अंडी वाया जातात, हे लक्षात घेतलं तरी साधारण 4 लाख अंडी विकली जाऊ शकतात. घाऊक बाजारपेठेत साधारण 6 रुपयाला एक याप्रमाणे अंडी विकली जातात. यानुसार तुम्ही वर्षभरात साधारण 24 लाख रुपये म्हणजे 2 लाख रुपये महिन्याला कमवू शकता. त्यातून खर्च वजा जाता तुम्हाला महिन्याला एक लाख रुपयाचा नफा नक्की होऊ शकतो.
First published: