मराठी बातम्या /बातम्या /मनी /अवघ्या 10 हजार रुपयांत घरीच सुरू करा हा व्यवसाय; महिन्याला होईल 30 हजार रुपये कमाई

अवघ्या 10 हजार रुपयांत घरीच सुरू करा हा व्यवसाय; महिन्याला होईल 30 हजार रुपये कमाई

तुम्ही जर घरी बसून एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर लोणचं बनवणं (Pickle making business) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. घरातूनच तुम्ही हा व्यवसाय (business from home) सुरू करू शकता.

तुम्ही जर घरी बसून एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर लोणचं बनवणं (Pickle making business) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. घरातूनच तुम्ही हा व्यवसाय (business from home) सुरू करू शकता.

तुम्ही जर घरी बसून एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर लोणचं बनवणं (Pickle making business) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. घरातूनच तुम्ही हा व्यवसाय (business from home) सुरू करू शकता.

    नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : लोणचं आपल्या जेवणातील एक महत्त्वाचा घटक आहे. जेवणाला रंगत आणणारं हे लोणचं, तुम्हाला पैसेही कमवून देऊ शकतं. तुम्ही जर घरी बसून एखादा व्यवसाय (Home business ideas) करण्याचा विचार करत असाल, तर लोणचं बनवणं (Pickle making business) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. घरातूनच तुम्ही हा व्यवसाय (business from home) सुरू करू शकता. पुढे कमाई वाढली, की हा व्यवसाय मोठ्या जागी हलवण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. जाणून घ्या हा व्यवसाय कसा करता येईल, यातून किती कमाई होईल?

    अवघ्या दहा हजार रुपयांत करा सुरूवात -

    लोणचं बनवण्याचा व्यवसाय तुम्ही अवघ्या दहा हजार रुपयांमध्ये (Start business in 10K rupees) सुरू करू शकता. तसंच, तुमच्या लोणच्याची मागणी, पॅकिंग आणि तुमच्या परिसरानुसार यातून महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमाई (Pickle business earnings) केली जाऊ शकते. तुम्ही हे लोणचं ऑनलाईन, रिटेल मार्केट आणि रिटेल चेन अशा विविध पर्यायांमार्फत विकू शकता.

    दररोज केवळ 2 रुपये जमा करुन मिळवता येईल 36 हजार रुपये पेन्शन, पाहा काय आहे योजना

    लोणच्याचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला साधारणपणे 900 वर्गफूट जागेची गरज आहे. लोणचं तयार करणं, वाळवणं तसंच त्याचं पॅकिंग (requirements for pickle business) या सगळ्यासाठी मोठ्या आणि मोकळ्या जागेची गरज असते. तसंच, अधिक काळ टिकण्याच्या दृष्टीने लोणचं बनवताना स्वच्छतेची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

    Baba Ramdev करणार नवीन व्यवसाय, शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा काय आहे योजना

    पहिल्याच कामात गुंतवणूक वसूल -

    लोणचं बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला दहा हजार रुपये खर्च (Pickle business cost) येतो. तसंच, पहिल्याच वेळी तयार करण्यात आलेल्या लोणच्यामधून तुम्ही जवळपास वीस हजार रुपये कमवू शकता. म्हणजेच, पहिल्याच कामात तुमची गुंतवणूक पूर्णपणे वसूल होते. यानंतर निव्वळ नफा मिळण्यास सुरुवात होते. जसंजसं तुमचा अनुभव वाढत जाईल, नवनवीन आयडिया (ideas for pickle business) वापरुन तुम्ही उत्पादन आणि खपही वाढवू शकाल.

    लायसन्स मिळवणं आवश्यक -

    लोणच्याचा व्यापार करण्यासाठी तुम्हाला परवान्याची गरज असते. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी (FSSAI) मार्फत लायसन्स मिळवल्यानंतर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरुन अर्ज करावा लागतो. हा अर्ज तुम्ही घरबसल्याही करू शकता.

    First published:

    Tags: Small business, Small investment business