• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये

घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला कमवा 5 ते 10 लाख रुपये

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी क्राफ्ट पेपर (Craft Paper) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 40 रुपये किलो दराने हा क्राफ्ट पेपर मिळतो. क्राफ्ट पेपर जितका चांगला तितकी बॉक्सची गुणवत्ता चांगली असते.

  • Share this:
नवी दिल्ली 26 जुलै : स्वतःचा व्यवसाय (Business) सुरू करण्याची अनेकांची इच्छा असते; पण कोणता व्यवसाय सुरू करावा याबाबत अनेकजण संभ्रमात असतात. व्यवसाय चालेल का? त्यासाठी भांडवल, जागा याची पूर्तता होईल का अशा अनेक शंका सतावत असतात. तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अशा एका व्यवसायाबद्दल आज आम्ही माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दरमहा 5 लाख रुपये कमवू शकता. यासाठी लागणारी जागा आणि भांडवलही तुलनेत कमी आहे. हा व्यवसाय आहे कार्डबोर्ड बॉक्सेसचा (Cardboard). सध्या ऑनलाइन व्यवसायात कार्डबोर्डची मागणी वाढली आहे. वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी कार्डबोर्ड बॉक्सेसची गरज असते आणि सध्या याची मागणी वाढली आहे. या व्यवसायात कायम मागणी असल्यानं मंदी येण्याची शक्यता अगदी कमी असते. त्यामुळे यात तुम्ही भरघोस नफा कमवू शकता. कच्चा माल : हा व्यवसाय सुरू करण्यासाठी क्राफ्ट पेपर (Craft Paper) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 40 रुपये किलो दराने हा क्राफ्ट पेपर मिळतो. क्राफ्ट पेपर जितका चांगला तितकी बॉक्सची गुणवत्ता चांगली असते. 1 ऑगस्टपासून पगार, pension आणि EMI पेमेंटसाठी लागू होणार नवा नियम, RBI ची माहिती आवश्यक जागा : हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सुमारे 5000 चौरस फूट जागेची (Space) आवश्यकता असेल. कारण यामध्ये एक बॉक्स तयार करण्यासाठी काही यंत्रे आणि इतर व्यवस्था याकरता जागेची गरज असते. तसंच माल ठेवण्यासाठीही गोदाम लागेल. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी कार्डबोर्ड बॉक्सचा व्यवसाय सुरू करू नये. कारण बॉक्सेसचा आकार मोठा असल्यानं तयार मालाची ने-आण करताना अडचणीचे होते. बहुतेक लोक हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. आवश्यक यंत्रे : या व्यवसायासाठी काही यंत्रांची (Machines) गरज असते. सध्या बाजारपेठेत सेमी ऑटोमॅटिक मशीन (Semi Automatic Machines) आणि फुल्ली ऑटोमॅटिक (Fully Automatic) अशी दोन प्रकारची यंत्रे उपलब्ध आहेत. त्यानुसार या व्यवसायातील गुंतवणूकीतही (Investment) फरक पडतो. तसंच या यंत्राच्या आकारातही फरक असल्यानं त्यानुसार जागेच्या उपलब्धतेचाही विचार करावा लागतो. Missed Call आणि WhatsApp द्वारे बुक करा LPG Gas Cylinder, जाणून घ्या सोपी पद्धत नफ्याचे गणित : या व्यवसायातील वर्षभर मागणी (Demand) कायम असते. सध्याच्या कोरोना काळात तर ऑनलाइन खरेदी वाढल्यानं अशा बॉक्सची मागणी खूपच वाढली आहे. त्यामुळं यात फायदाही चांगला मिळत आहे. तुम्ही उत्तम पद्धतीनं मार्केटिंग केलेत तर तुम्ही अगदी सहजपणे दरमहा 5 ते 10 लाख रुपये मिळवू शकता. किती गुंतवणूक आवश्यक आहे : तुम्हाला हा व्यवसाय छोट्या प्रमाणात करायचा असेल तर गुंतवणूकही (Investment) कमी लागेल. मात्र या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या मशीन्स महाग असतात. सेमी ऑटोमॅटिक मशीन घेतली तर तुम्हाला 20 लाखांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल आणि फुल्ली ऑटोमॅटिक मशीन घेतली तर 50 लाखांपर्यंत गुंतवणूक करावी लागू शकेल.
First published: