घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय आणि वर्षाला कमवा लाखो रुपये

घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय आणि वर्षाला कमवा लाखो रुपये

Hydroponics Farming, New Business - यात तुम्हाला कमी पैसे गुंतवावे लागतील आणि कमाईही चांगली होईल

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : तुम्हाला घरबसल्या व्यवसाय सुरू करायचा असेल तर एक चांगली कल्पना आहे. यात तुम्हाला कमी पैसे गुंतवावे लागतील आणि कमाईही चांगली होईल. हा व्यवसाय आहे मातीशिवाय शेतीचा. त्यासाठी तुम्हाला घरासमोर छोटं अंगण किंवा घरावर गच्ची  हवी. टेरेस फार्मिंग म्हणजेच गच्चीवरची शेती हा ट्रेंड सध्या वाढतोय. यात माती वापरली जात नाही. झाडाला लागणारी पोषक द्रव्य पाण्यातून दिली जातात. याला हायड्रोपॅनिक्स तंत्र म्हणतात. यात झाडं एका मल्टिलेयर फ्रेमच्या आधारे पाइपमध्ये लावली जातात. त्यांची मूळं पाइपच्या आता पोषक द्रव्यांनी भरलेल्या पाण्यात सोडतात.

वर्षाला 2 लाख रुपये कमाई

महाग फळं, भाज्या यांची लागवड करून तुम्ही वर्षाला 2 लाख रुपये कमाई करू शकता.

पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षकांच्या 78 जागांवर भरती, असा करा अर्ज

1 लाखात 400 रोपटी लावू शकता

दोन मीटर उंच एका टाॅवरमध्ये जवळजवळ 35 ते 40 रोपटी लावू शकता. जवळजवळ 400 रोपट्यांचे 10 टाॅवर तुम्ही 1 लाख रुपयापर्यंत खरेदी करू शकता. नंतर तुम्हाला बिया आणि पोषक तत्त्वांचाच खर्च येईल.

अर्थसंकल्पाचा घरखर्चावरही होणार परिणाम; कोणत्या गोष्टी महागल्या, कोणत्या स्वस्त?

हायड्रोपॅनिक्स तंत्राची कमाल

या तंत्राच्या सेटअपसाठी अनेक कंपन्या काम करतात. तुमची व्यावसायिक शेती सेट करून देण्यासाठी तुम्हाला या कंपन्यांची मदत मिळू शकते. लेटसेक्ट्रा एग्रीटेक बिटमाइंस इनोवेशन्स, फ्युचर फार्म्स, हमारी कृषी अशा स्टार्टअप कंपन्या यात काम करतात. तुम्ही यांच्याकडून हा सेटअप खरेदी करू शकता.

लॉस एंजल्सला शक्तिशाली भूकंपाचा धक्का; रस्त्यांना पडल्या भेगा!

मोसमापासून बचाव आवश्यक

ही शेती नियंत्रित वातावरणात होते. त्यामुळे झाडांना बदलत्या ऋतूपासून वाचवण्यासाठी नेट सेड किंवा पाॅली हाऊसची गरज लागते. ज्या भाज्या, फळं यांना जास्त मागणी आहे त्याचं उत्पादन शेतकरी करतात.

रानडुकराचा दिव्यांग तरुणावर हल्ला; जीव वाचवतानाची धडपड कॅमेऱ्यात कैद

First published: July 6, 2019, 12:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading