मराठी बातम्या /बातम्या /मनी /अवघ्या 50 हजारात सुरू करा हा व्यवसाय, मिळेल लाखो रुपयांचा नफा, सरकारही देतंय 40 टक्के अनुदान

अवघ्या 50 हजारात सुरू करा हा व्यवसाय, मिळेल लाखो रुपयांचा नफा, सरकारही देतंय 40 टक्के अनुदान

फक्त 50 हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. मशरूम शेती कशी करावी याची, माहिती येथे देत आहोत.

फक्त 50 हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. मशरूम शेती कशी करावी याची, माहिती येथे देत आहोत.

फक्त 50 हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. मशरूम शेती कशी करावी याची, माहिती येथे देत आहोत.

  नवी दिल्ली 03 डिसेंबर : अनेकांना नोकरीच्या बंधनात अडकून राहण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय (Business) करण्याची इच्छा असते. मात्र कधी चांगल्या बिझनेस आयडियाच्या (Business Idea) अभावी, तर कधी पैशांच्या अभावी त्यांना आपली इच्छा पूर्ण करता येत नाही. तुम्हीदेखील अशा व्यक्तींपैकी असाल, तर कमी पैशांत सुरू करता येण्यासारखा एक व्यवसाय आम्ही तुम्हाला सुचवत आहोत. अळंबी अर्थात मशरूमची लागवड करून तुम्ही भरपूर नफा (Profit) कमावू शकता. सध्याच्या काळात मशरूमला मोठ्या प्रमाणात मागणीही आहे.

  विशेष म्हणजे मशरूमच्या शेतीसाठी (Mushroom Farming) तुम्हाला मोठ्या जागेची किंवा शेतजमिनीची गरज भासणार नाही. अगदी घराच्या चार भिंतींच्या आतदेखील तुम्ही ही मशरूम शेती करू शकता. यासाठी अतिशय सोपं प्रशिक्षणही उपलब्ध आहे. केवळ पौष्टिकता आणि औषधी दृष्टिकोनातूनच नाही, तर निर्यातीसाठीही मशरूम महत्त्वाचं आहे. फक्त 50 हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. मशरूम शेती कशी करावी याची, माहिती येथे देत आहोत.

  कशी कराल मशरूम शेती?

  तुम्हाला मशरूम व्यवसायातून भरघोस कमाई करायची असेल, तर मशरूम लागवडीच्या तंत्राकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. कमीत कमी 40×30 फूट जागेत तीन-तीन फूट रुंदीचे रॅक बनवून मशरूमची लागवड करता येते. साधारण प्रति चौरस मीटर जागेतून 10 किलो मशरूमचं उत्पादन मिळू शकतं. मशरूम शेतीसाठी सरकारी अनुदानदेखील (Subsidy) उपलब्ध आहे. त्याच्या मदतीनं तुम्ही हा मशरूम शेती व्यवसाय सुरू करू शकता.

  कंपोस्ट तयार करण्याची प्रक्रिया

  मशरूम लागवडीमध्ये कंपोस्ट खताची (Compost manure) आवश्यकता असते. कंपोस्ट तयार करण्यासाठी भाताचा पेंढा भिजवावा लागतो. एका दिवसानंतर त्यात डीएपी, युरिया, पोटॅश, गव्हाचा कोंडा, जिप्सम आणि कार्बोफ्युडोरन (Carbofudoran) मिसळून कुजण्यासाठी ठेवलं जातं. साधारण दीड महिन्यानंतर कंपोस्ट खत तयार होतं. शेणखत आणि माती समप्रमाणात मिसळून दीड इंच जाडीचा थर करून त्यावर दोन ते तीन इंच जाडीपर्यंत कंपोस्ट खत घातलं जातं. त्यावर मशरूम पेरलं जातं. कंपोस्टमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याची फवारणी केली जाते आणि दोन इंच कंपोस्टचा थर घातला जातो. अशा प्रकारे मशरूमचं उत्पादन सुरू होतं.

  ट्रेनिंग घेऊन सुरू करा मशरूम शेती

  अनेकांसाठी मशरूम शेती ही पूर्णपणे नवीन गोष्ट आहे. त्यामुळं त्यांना प्रशिक्षणाची गरज भासते. देशातली सर्व कृषी विद्यापीठं (Agricultural Universities) आणि कृषी संशोधन केंद्रांमध्ये (Agricultural Research Centers) मशरूम लागवडीचं प्रशिक्षण दिलं जातं. तुम्ही मोठ्या प्रमाणावर मशरूम लागवड करण्याचा विचार करत असाल, तर एकदा योग्य प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे.

  50 हजारांच्या गुंतवणुकीपासून करू शकता सुरुवात?

  मशरूम शेतीचा खर्च अनेक घटकांवर अवलंबून असतो. 50 हजार ते 1 लाख रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही मशरूम शेती सुरू करू शकता. या शेतीसाठी सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी आणि कर्जही उपलब्ध आहे.

  किती होईल कमाई?

  प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीनं मशरूम शेतीची सुरुवात केली तर लाखो रुपयांची कमाई करता येते. संपूर्ण जगात मशरूम शेतीच्या वाढीचा दर 12.9 टक्के इतका आहे. तुम्ही 100 स्क्वेअर फूट क्षेत्रात मशरूमची लागवड केली तर वर्षाकाठी 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो.

  First published:

  Tags: Small investment business, Start business