मोदी सरकारमुळे या उद्योगाला 'अच्छे दिन', तुम्हीही कमावू शकता महिन्याला 50 हजार

मोदी सरकारमुळे या उद्योगाला 'अच्छे दिन', तुम्हीही कमावू शकता महिन्याला 50 हजार

कमी गुंतवणूक करून चांगलं उत्पन्न मिळविण्यासाठी स्टार्टअपचा हा पर्याय उत्तम ठरू शकतो. त्याचबरोबर लोन मिळण्याचीही सुविधा आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 6 नोव्हेंबर : मोदी सरकार (Modi Government) ने सिंगल यूज प्लास्टिक प्रॉडक्ट्सवर (Single Use Plastic Ban) बंदी घातलीय. अशा प्रॉडक्ट्सच्या वापरावरही बंदी असल्याने जूट उद्योगाला (Jute Industry) त्याचा मोठा फायदा मिळालाय. जूट उद्योगाच्या वाढीला त्यामुळे प्रचंड वेग आला असून त्यांच्याकडच्या मागणीतही मोठी वाढ झालीय. जूटपासून जे लोक विविध उपयोगाच्या वस्तू तयार करतात त्यांच्या उत्पादनांना मागणी वाढल्याने त्यांना येणाऱ्या ऑडर्सच्या संख्येतही वाढ झालीय. त्यामुळे जे तरुण नवा व्यवसाय (New Business Idea)  करण्याचा विचार करताहेत त्यांनी जूटपासून तयार होणाऱ्या उत्पादनांचा विचार केला पाहिजे. सरकारी योजनांचा फायदा घेत उद्योग सुरू केला तर महिन्याला 50 हजारांपर्यंत कमाई होऊ शकते. कमी गुंतवणूक करून चांगली कमाई करण्याचा विचार असेल तर तुम्ही जूटपासून बॅग आणि इतर वस्तू तयार करणाऱ्या युनिट्सचा विचार करू शकता. आकर्षकता आणि वापरण्यास सहज असलेल्या या बॅग नव्या काळाची गरज आणि पर्यावरणपुरक असल्याने त्याच्या वापराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दणका, आता मिळणार नाही 'या' कामासाठी पैसे

बिजनेस स्टँडर्डमध्ये आलेल्या वृत्तानुसार बिर्ला कॉर्पोरेशनच्या जूट मिल्सला तब्बल 20 लाख जूट बॅग्स बनविण्याची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे त्यांना आपली क्षमता वाढवावी लागणार असून ते नवं युनिट् टाकण्याचा विचार करताहेत. सहा वर्षांपूर्वी त्यांनी जूट बॅग बनविण्याचं युनिट सुरू केलं होतं. त्या युनिटमध्ये 1,50,000 बॅग बनविण्याची क्षमता आहे. पण आता ते युनिटही अपुरं पडूलागल्याने नवीन युनिट उभारण्याची तयारी  ते करत आहेत.

जूट उत्पादनात 15 टक्क्यांची वाढ होणार असल्याचं जूट मिल्स असोसिएशनचे माजी संचालक संजय कजारिया यांनी सांगितलंय. जसी मागणी वाढेल तसा हा उद्योगही वाढणार असल्याचं ते म्हणाले. फक्त देशातच नाही तर विदेशातही या जूट उत्पादनांची मागणी वाढत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

RSEP : जगातल्या सर्वात मोठ्या व्यापार करारात सहभागी होण्यास भारताचा नकार

अशी होऊ शकते युनिट्सची सुरूवात

केंद्र सरकारच्या वस्रोद्योग आणि हँडीक्राफ्ट विभागाने याबाबत माहिती दिलीय.  जूट बॅग बनविण्याचं एक युनिट टाकायचं असेल तर त्यासाठी 5 शिलाई मिशिन्सची गरज असते. त्यातल्या दोन मिशिन्स जास्त क्षमतेच्या पाहिजेत. यावर 90 हजारांचा खर्च होतो. अतर इतर गोष्टींवर 2 लाखांचा खर्च अपेक्षीत आहे. असं सगळं मिळून अंदाजे 3 लाख रुपयांचा खर्च एका युनिटवर होऊ शकतो.

कोट्यधीश बनण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, फक्त एवढच काम करा

या कॅपिटल कॉस्टच्या आधारावर लोन मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यात एक महिन्यांचं रॉ मटेरियल. एक महिन्यांचं वेतनचा समावेश आहे. यासाठी 65 टक्के मुद्रा तर 25 टक्के नॅशनल सेंटर फॉर जूट डायव्हर्फिकेशन (NCFD)कडून लोन मिळू शकतं. 25 ते 30 हजार रुपये हे तुम्हाला खिशातून घालावे लागणार आहेत.

उत्पादन किती होणार? - या प्रोजेक्टच्या आधारे तुम्ही युनिट टाकणार असलात तर वर्षाला 9 हजार शॉपिंग बॅग, 6 हजार लेडीज बॅग, 7500 स्‍कूल बॅग, 9 हजार जेंट्स हैंड बॅग, 6 हजार जूट बांम्‍बू फोल्‍डर तयार करू शकता.

देशातील या 5 बँकांमध्ये मिळतंय FD वर सर्वात जास्त व्याज, तुमचं खातं आहे का?

अशी होणार कमाई -

वर्षभरात रॉ मटेरियल, सॅलरी, रेंट, बँकेचं व्याज इत्यादी गोष्टींवर अंदाजे 27.95 लाख रुपये खर्च येईल. त्यातून वर्षभरात तुम्हाला 40 लाखांच्या आसपास व्यवसाय मिळू शकतो. त्यातून वर्षाला 6 लाखांच्या आसपास नफा होऊ शकते. म्हणजे महिन्याला 50 हजार तुम्ही कमाई करू शकता.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 6, 2019, 6:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading