मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पहिला पगार होताच करा हे काम; 10 वर्षांमध्ये व्हाल करोडपती!

पहिला पगार होताच करा हे काम; 10 वर्षांमध्ये व्हाल करोडपती!

आपल्याला आयुष्यातल्या जवळपास सगळ्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. आपण लखपती, कोट्यधीश (Become a Crorepati) असावं हे सर्वांचंच स्वप्न असतं; मात्र ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने अगदी कमी जण प्रयत्नशील राहतात.

पुढे वाचा ...
मुंबई, 12 ऑगस्ट : आपल्याला आयुष्यातल्या जवळपास सगळ्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. आपण लखपती, कोट्यधीश (Become a Crorepati) असावं हे सर्वांचंच स्वप्न असतं; मात्र ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने अगदी कमी जण प्रयत्नशील राहतात. तुमचंही असंच स्वप्न असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स (Investment Tips) सांगणार आहोत. एप्सिलॉन मनी (Epsilon Money) कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ अभिषेक देव (Abhishek Dev) यांनी या टिप्स दिल्या आहेत. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पहिल्या पगारापासूनच सुरू करा गुंतवणूक अभिषेक देव सांगतात, की पहिल्या पगारापासूनच तुम्ही गुंतवणूक (Start Investment from first Salary) सुरू केली, तर काही वर्षांमध्येच तुमच्याकडे भरपूर पैसे असू शकतात. एसआयपी (SIP) करण्यासाठी योग्य म्युच्युअल फंड निवडणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर किंवा गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊ शकता. तसंच, दर वर्षी पगारवाढ झाल्यानंतर किंवा प्रमोशन मिळाल्यानंतर तुम्ही एसआयपी वाढवण्यासंबंधी विचार करू शकता. तसंच, दर वर्षी आढावा घेतल्यामुळे तुम्ही तुमचं ध्येय गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहात की नाही हेदेखील स्पष्ट होऊन जातं. नियमितता गरजेची अभिषेक सांगतात, की गुंतवणूक करताना दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे, लवकर गुंतवणूक (Start Investing Early) सुरू करणं आणि दुसरी म्हणजे नियमित गुंतवणूक (Invest Consistently) करणं. नियमितता राखल्यामुळेच तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकाल; मात्र नियमित गुंतवणूक न केल्यास तुम्हाला अपेक्षित परतावा मिळणार नाही. दहाच वर्षांत होऊ शकता करोडपती अवघ्या दहा वर्षांमध्ये तुम्हाला कोट्यधीश (Become Crorepati in 10 Years) व्हायचं असेल, तर त्यासाठीदेखील अभिषेक यांनी एक फॉर्म्युला सांगितला आहे. तुम्ही एखाद्या एसआयपीमध्ये दर महिन्याला 45 हजार रुपये गुंतवले, तर दहा वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक 54 लाख रुपये असेल. यावर तुम्हाला दर वर्षी 12 टक्के परतावा मिळत आहे असं गृहीत धरलं, तर दहा वर्षांमध्ये तुमची एकूण रक्कम 1.04 कोटी रुपये एवढी होईल. एकत्र गुंतवणुकीतही उत्तम परतावा समजा, तुम्हाला एकाच वेळी भरपूर पैसे मिळाले, तर एकरकमी गुंतवणूक करण्याचा पर्यायही तुम्ही वापरू शकता. अभिषेक सांगतात, की 33 लाख रुपये तुम्ही दहा वर्षांसाठी गुंतवले, तर 12 टक्के वार्षिक परताव्यासह दहा वर्षांनंतर ही रक्कम 1.02 कोटी रुपये एवढी होईल. अशा प्रकारे तुम्ही एकरकमी गुंतवणूक करूनही दहा वर्षांमध्ये कोट्यधीश होऊ शकता. हे नियम पाळा पैसे वाढवण्यासाठी खर्च कमी करणं गरजेचं आहे. ज्या वर्षांमध्ये तुम्ही गुंतवणुकीवर लक्ष दिलं पाहिजे, त्या वर्षांमध्ये तुम्ही केवळ गरजेच्या वस्तूंवर खर्च करणं अपेक्षित आहे. आवश्यक गोष्टींमध्ये खर्च केल्यानंतर जेवढी रक्कम शिल्लक राहील तेवढी तुम्ही गुंतवणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही चांगला इक्विटी किंवा बॅलन्स्ड म्युच्युअल फंडाची निवड करू शकता.
First published:

पुढील बातम्या