• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Business Ideas: फक्त 50 ते 60 हजारात सुरू करा 'हा' व्यवसाय; मिळेल लाखोंचा नफा

Business Ideas: फक्त 50 ते 60 हजारात सुरू करा 'हा' व्यवसाय; मिळेल लाखोंचा नफा

Mushroom

Mushroom

कोरोनाच्या या बिकट काळात जर आपण एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मशरूम व्यवसाय (mushroom farming) सुरू करू शकता. बटण मशरूम (button Mushroom) ही एक अशी प्रजाती आहे, ज्यामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे विपुल प्रमाणात आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 07 मे : कोरोनाच्या या बिकट काळात जर आपण एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मशरूम व्यवसाय (mushroom farming) सुरू करू शकता. बटण मशरूम (button Mushroom) ही एक अशी प्रजाती आहे, ज्यामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्व विपुल प्रमाणात आहेत. या फायद्यांमुळे मशरूम लोकप्रिय होत आहे. विदेशी भाजी बटण मशरूमला रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्ससाठी चांगली मागणी आहे. आजकाल युट्यूबमधून हौशी, सुशिक्षित आणि वेगळ्या पदार्थांची चव चाखणाऱ्यांची  संख्याही वाढली आहे, ज्यामुळे बटण मशरूमच्या मागणीत वाढ होत आहे. बटण मशरूम खनिजे आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. या फायद्यांमुळे मशरूम लोकप्रिय होत आहे. बाजारात त्याची किरकोळ किंमत 300 ते 350 रुपये प्रति किलो आहे आणि घाऊक दर यापेक्षा 40 टक्के कमी आहे. त्यास मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोडून मशरूम वाढण्यास सुरुवात केली आहे. हे वाचा - LPG Gas Cylinder: गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर 800 रुपयांपर्यंत मिळेल सवलत; असा घ्या संधीचा लाभ 50 हजारांच्या गुंतवणुकीवर 2.50 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल बटण मशरूमच्या लागवडीसाठी कंपोस्ट तयार केले जाते. एक क्विंटल कंपोस्टमध्ये जवळपास दीड किलो बियाणे बसते. 4 ते 5 क्विंटल कंपोस्ट बनवल्यानंतर सुमारे 2 हजार किलो मशरूम तयार होऊ शकतात. जर 2 हजार किलो मशरूम किमान 200 रुपये प्रतिकिलो दराने विकले गेले तर तुम्हाला सुमारे 4 लाख रुपये मिळतील. यातून आपण लागवडीचा खर्च 50 ते 60 हजार रुपये वजा केला तरी आपल्याला 2.50 ते 3 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. अगदी कमी जागेत मशरूमची शेती सुरू होईल प्रति वर्ग मीटर जागेत 10 किलोग्राम मशरूम आरामात वाढवता येते. कमीतकमी 40 x 30 फूट जागेत तीन- तीन फूट रुंद रॅक बनवून मशरूम वाढवता येऊ शकते. हे वाचा - कोरोनाला हरवण्यासाठी या 2 गोष्टींचा होईल उपयोग, अमेरिकेच्या सर्वात मोठ्या हेल्थ एक्सपर्टनं सांगितले उपाय कंपोस्ट कसे तयार करावे कंपोस्ट तयार करण्यासाठी, भात पेंढा एक दिवस ओला करून ठेवावा आणि त्यानंतर त्यात डीएपी, युरिया, पोटॅश, गव्हाचा कोंडा, जिप्सम आणि कार्बोफुडोरन घालू त्याला कुजू द्यावे. सुमारे दीड महिन्यांनंतर कंपोस्ट तयार होते. आता शेण आणि माती समप्रमाणात एकजीव करून जवळपास एक दीड इंच जाड थर करावा. मातीचा थर घालून त्यावर कंपोस्टचा दोन ते तीन इंच जाड थर बसविला जातो. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मशरूममध्ये दिवसातून दोन ते तीन वेळा स्प्रेद्वारे पाणी फवारले जाते. त्यावर कंपोस्टचा एक दोन इंचाचा थर परत बसवला जातो आणि अशा प्रकारे मशरूमचे उत्पादन सुरू होते. मशरूम शेतीत प्रशिक्षण घ्या सर्व कृषी विद्यापीठे व कृषी संशोधन केंद्रांमध्ये मशरूम लागवडीचे प्रशिक्षण दिले जाते. जर आपण मोठ्या प्रमाणात शेती करण्याची योजना आखत असाल तर एकदा योग्यप्रकारे मशरूम लागवडीचे प्रशिक्षण घेणे केव्हाही उपयुक्त ठरेल.
  Published by:News18 Desk
  First published: