Home /News /money /

Business Idea : रेल्वेसोबत काम करुन महिन्याला हजारो रुपये कमावण्याची संधी, काय करावं लागले?

Business Idea : रेल्वेसोबत काम करुन महिन्याला हजारो रुपये कमावण्याची संधी, काय करावं लागले?

indian railway

indian railway

सर्वात आधी तुम्हाला तुमचे ऑनलाइन तिकीट काढण्यासाठी IRCTC च्या वेबसाइटला भेट देऊन एजंट होण्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही अधिकृत तिकीट बुकिंग एजंट व्हाल.

    मुंबई, 4 डिसेंबर : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ही रेल्वेची एक सर्विस आहे. याद्वारे ट्रेन तिकीट बुकिंगपासून अनेक सुविधा पुरवल्या जातात. IRCTC च्या मदतीने तुम्ही देखील दरमहा हजारो रुपये कमवू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला फक्त तिकीट एजंट (Ticket Agent) व्हायचे आहे. ज्याप्रमाणे रेल्वे काउंटरवर  (Railway ticket counter) लिपिक तिकीट देतात, त्याचप्रमाणे तुम्हाला प्रवाशांचे तिकीट द्यावे लागेल. अर्ज कसा करायचा? सर्वात आधी तुम्हाला तुमचे ऑनलाइन तिकीट (Online Ticket Booking) काढण्यासाठी IRCTC च्या वेबसाइटला भेट देऊन एजंट होण्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही अधिकृत तिकीट बुकिंग एजंट व्हाल. त्यानंतर तुम्ही तिकीट बुक करू शकता. एजंट्सना तिकिटांच्या बुकिंगवर IRCTC कडून चांगलं कमिशन मिळते. भविष्यातील डिजिटल विश्वाचं नेतृत्व भारताकडेच, मुकेश अंबानींना विश्वास किती कमिशन मिळते? कोणत्याही प्रवाशासाठी, नॉन-एसी कोचचे तिकीट बुक करण्यासाठी प्रति तिकीट 20 रुपये आणि एसी वर्गाचे तिकीट बुक करण्यासाठी 40 रुपये प्रति तिकीट कमिशन उपलब्ध आहे. याशिवाय तिकिटाच्या किमतीच्या एक टक्के रक्कमही एजंटला दिली जाते. IRCTC चे एजंट बनण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे यामध्ये तिकीट बुक करण्याची मर्यादा नाही. एका महिन्यात तुम्हाला हवी तितकी तिकिटे बुक करू शकता. याशिवाय 15 मिनिटांत तत्काळ तिकीट बुक करण्याचाही पर्याय आहे. एजंट म्हणून, तुम्ही ट्रेन व्यतिरिक्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई तिकिटे बुक करू शकता. कमाई 80,000 रुपयांपर्यंत असू शकते एका महिन्यात एजंट किती तिकीट बुक करू शकतात यावर मर्यादा नाही. त्यामुळे एका महिन्यात अमर्यादित तिकिटे बुक करता येतात. एजंट्सना प्रत्येक बुकिंग आणि व्यवहारावर कमिशन मिळते. एजंट दरमहा 80,000 रुपयांपर्यंत नियमित उत्पन्न मिळवू शकतो. काम कमी झालं तरी देखील सरासरी 40-50 हजार रुपये मिळू शकतात. पेनी स्टॉकचा धमाका! 2 रुपयांचा स्टॉक 74 रुपयांवर, सहा महिन्यात 1 लाख बनले 34 लाख इतकी फी भरावी लागेल? जर तुम्हाला एका वर्षासाठी एजंट व्हायचे असेल तर IRCTC ला 3999 रुपये शुल्क भरावे लागेल, तर दोन वर्षांसाठी हे शुल्क 6999 रुपये आहे. त्याच वेळी, एजंट म्हणून, एका महिन्यात 100 तिकिटे बुक करण्यासाठी, प्रति तिकिट 10 रुपये शुल्क आकारले जाईल, तर एका महिन्यात 101 ते 300 तिकिटे बुक करण्यासाठी, प्रति तिकिट 8 रुपये आणि एका महिन्यात 300 पेक्षा जास्त तिकिटे बुक करण्यासाठी 5 रुपये प्रति तिकिट शुल्क आकारले जाईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Business, Railway

    पुढील बातम्या