मराठी बातम्या /बातम्या /मनी /70 हजार रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय; 25 वर्षापर्यंत होईल मोठी कमाई

70 हजार रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय; 25 वर्षापर्यंत होईल मोठी कमाई

 केंद्र सरकारच्या ‘न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालया’तर्फे रुफटॉप सोलर प्लांटसाठी (Rooftop solar plant) 30 टक्के सबसिडी मिळते. यातून तयार होणारी वीज तुम्ही सरकारला विकू शकता.

केंद्र सरकारच्या ‘न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालया’तर्फे रुफटॉप सोलर प्लांटसाठी (Rooftop solar plant) 30 टक्के सबसिडी मिळते. यातून तयार होणारी वीज तुम्ही सरकारला विकू शकता.

केंद्र सरकारच्या ‘न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालया’तर्फे रुफटॉप सोलर प्लांटसाठी (Rooftop solar plant) 30 टक्के सबसिडी मिळते. यातून तयार होणारी वीज तुम्ही सरकारला विकू शकता.

  नवी दिल्ली, 29 जुलै: व्यवसाय म्हटलं, की गुंतवणूक आणि जागेचा प्रश्न समोर येतो. मात्र, असा एक व्यवसाय आहे ज्यासाठी तुम्हाला वेगळी जागा विकत घ्यावी लागणार नाही. आपल्या घराच्या छतावरच (Start business on terrace) हा व्यवसाय सुरू करुन, तुम्ही घरबसल्या लाखो रुपये (Earn money from home) कमावू शकाल. यासाठी तुम्हाला घराच्या छतावर सोलर पॅनल (Solar Panel on roof) बसवावे लागतील. यासाठी साधारणपणे एक लाख रुपये खर्च येतो. पण, केंद्र सरकारच्या ‘न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालया’तर्फे रुफटॉप सोलर प्लांटसाठी (Rooftop solar plant) 30 टक्के सबसिडी मिळते. यातून तयार होणारी वीज तुम्ही सरकारला विकू शकता.

  अवघ्या 70 हजारांमध्ये उभारता येतो प्लांट -

  एक किलोवॅट क्षमतेच्या एका सोलर पॅनलची (Solar plant business) किंमत सुमारे एक लाख रुपये असते. सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीनंतर ही किंमत 60 ते 70 हजारांपर्यंत जाते. प्रत्येक राज्यामध्ये हे दर थोड्याफार फरकाने वेगळे असतात. तसंच, काही राज्यांमध्ये 30 टक्क्यांव्यतिरिक्त अधिक सबसिडीही (Solar panel subsidy) मिळते. जर तुमच्याकडे प्लांट बसवण्यासाठी लागणारे 70 हजार रुपये नसतील, तर कोणत्याही बँकेतून यासाठी तुम्ही लोन (Loan for solar plant) घेऊ शकता.

  25 वर्षांपर्यंत होत राहील कमाई -

  सोलर पॅनलचं आयुष्य साधारणपणे 25 वर्षे (Solar panel life) असतं. आपल्या घराच्या छतावर हे प्लांट झाल्यानंतर यातून निर्माण होणारी वीज आपण वापरू शकतो. तसंच, तुम्ही वापरुन शिल्लक राहिलेली वीज ही ग्रिडच्या माध्यमातून (Sell energy with grid) कोणत्याही कंपनीला किंवा थेट सरकारला विकू शकता. म्हणजेच, तुमच्या घराचं वीजबिल तर वाचेलच, शिवाय कमाईही होईल. तुमच्या घराच्या गच्चीत किंवा छतावर दिवसाचे 10 तास सूर्यप्रकाश पडत असेल, तर दोन किलोवॅटच्या सोलार पॅनलचा वापर करुन तुम्ही दिवसाला 10 युनिट वीज तयार करू शकाल. म्हणजेच, महिन्याला तुम्ही जवळपास 300 युनिट वीज तयार करू शकाल.

  VIDEO तयार करा आणि मिळवा 100000 रुपये, IRCTC देत आहे ही सुवर्णसंधी

  तुम्ही जास्तीत जास्त पाचशे वॅट क्षमतेचा एक पॅनल बसवू शकता. एक किलोवॅट क्षमतेचा प्लांट बसवण्यासाठी असे दोन पॅनल आवश्यक आहेत. हा एक पॅनल बसवण्यासाठी साधारणपणे 50 हजार रुपये खर्च येईल. आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही एक किलोवॅट ते पाच किलोवॅट क्षमतेपर्यंतचे प्लांट बसवू शकता.

  विशेष म्हणजे, हे सोलर पॅनल एकदा बसवले, की किमान दहा वर्षं त्यांच्याकडे पाहण्याची गरज (solar panel maintenance) भासत नाही. दर 10 वर्षांनी त्यांची बॅटरी बदलावी लागते. यासाठी सुमारे 20 हजार रुपये खर्च येतो. तसंच, मधल्या काळात तुम्ही घर बदललं तरी चिंता करण्याची गरज नाही. हे पॅनल सहजपणे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येतात.

  Good News! Google च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 50000, वाचा काय आहे प्रोसेस

  अशी करा सोलर पॅनलची खरेदी -

  यासाठी सर्वात आधी तुम्हाला राज्य सरकारच्या रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट अथॉरिटीला संपर्क साधावा लागेल. तुमच्या जवळच्या मोठ्या शहरात याचं कार्यालय असेल. तसंच, मोठ्या शहरांमध्ये काही खासगी डीलर्सकडेही सोलर पॅनल (how to buy solar panel) मिळू शकतील. सबसिडीचा अर्ज तुम्हाला अथॉरिटीच्या कार्यालयातच मिळेल. तसंच, यासाठी कर्ज घ्यायचं असेल, तर तुम्हाला आधी कार्यालयात जाऊन त्याबाबत माहिती द्यावी लागेल. अशा पद्धतीने तुम्ही केवळ 70 हजार रुपयांत नवा व्यवसाय सुरू करून 25 वर्षांपर्यंत त्यातून उत्पन्न मिळवू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Business, Small business, Small investment business, Start business