'हा' व्यवसाय सुरू केलात तर रोज कमवाल 4 हजार रुपये

'हा' व्यवसाय सुरू केलात तर रोज कमवाल 4 हजार रुपये

तुम्हाला नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो एका खास व्यवसायाबद्दल. ज्यात तुम्ही चांगली कमाई करू शकाल.

  • Share this:

मुंबई, 07 मे : तुम्हाला नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो एका खास व्यवसायाबद्दल. ज्यात तुम्ही चांगली कमाई करू शकाल. हा आहे केळ्यांच्या चिप्सचा व्यवसाय. हे चिप्स तब्येतीला चांगले असतात. उपवासालाही लोक हे चिप्स खातात. बटाटा चिप्सपेक्षा केळ्याच्या चिप्सना जास्त मागणी आहे. म्हणून ते जास्त विकले जातात. या चिप्सचा मार्केट साइज छोटा आहे. म्हणून शक्यतो ब्रँडेड कंपन्या या चिप्स बनवत नाहीत. म्हणूनच केळ्यांच्या चिप्सना जास्त मागणी आहे.

केळ्याच्या चिप्स बनवण्यासाठी या सामानाची गरज

केळ्याच्या चिप्स बनवण्यासाठी विविध मशीन्सची गरज लागते. कच्चा माल म्हणून कच्ची केळी, मीठ, खाण्याचं तेल आणि इतर मसाले लागतील. काही महत्त्वाच्या मशीन्स पुढीलप्रमाणे


  1. केळी धुण्यासाठी टँक आणि केळी सोलण्याचं मशीन

  2. केळ्याचे पातळ तुकडे कापण्याचं मशीन

  3. केळ्याचे तुकडे तळण्याचं मशीन

  4. मसाले मिसळण्याचं मशीन

  5. पाउच प्रींटिंग मशीन

  6. प्रयोगशाळेतली उपकरणं


अक्षय तृतीयेनिमित्त 'इथून' खरेदी करा सोन्याचे दागिने, मिळेल 'मोठं' डिस्काउंट

कुठून खरेदी करणार मशीन?

केळ्याच्या व्यवसायासाठी लागणारी मशीन्स https://www.indiamart.com/ किंवा https://india.alibaba.com/index.html या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. हे मशीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4 हजार ते 5 हजार चौरस फूट जागेची गरज लागेल. या मशीनची किंमत 28 हजारापासून 50 हजारापर्यंत आहे.

CSMT पूल दुर्घटना प्रकरणी चौथी अटक; निवृत्त सब इंजिनिअर गजाआड

50 किलो चिप्स बनवण्याचा खर्च

50 किलो चिप्स बनवण्यासाठी कमीत कमी 120 किलो कच्च्या केळ्यांची गरज आहे. 120 किलो कच्ची केळी तुम्हाला जवळजवळ एक हजार रुपयांना मिळतील. याबरोबर 12 ते 15 लीटर तेलाची गरज लागते. 15 लीटर तेल 70 रुपयांच्या हिशेबानं 1050 रुपयांना पडेल. चिप्स फ्रायर मशीनला एक तासात 10 ते 11 लीटर डिझेल लागतं. 1 लीटर डिझेल 80 रुपयांच्या हिशेबानं 11 लीटर लागलं तर 900 रुपयांना पडेल. मीठ आणि मसाले जास्तीत जास्त 150 रुपयांना पडतील. मग तुमचे 3200 रुपयांमध्ये 50 किलो चिप्स तयार होतील. म्हणजे एक किलोच्या चिप्सचं पाकीट 70 रुपयांना पडेल. तुम्ही आॅनलाइन किंवा किराणा दुकानात ते पाकीट 90 ते 100 रुपयांना विकू शकाल.

हॉटेलमध्ये सापडलं EVM; लोकांनी व्यक्त केला तीव्र संताप

1 लाख रुपयांचा फायदा

तुम्ही 1 किलोवर 10 रुपयांचा फायदा होईल, असा विचार केलात तर दिवसभरात 4 हजार रुपये सहज कमवू शकता. तुम्ही महिन्यातले 25 दिवस जरी काम केलंत तरी महिन्याला 1 लाख रुपये सहज कमवू शकाल.


VIDEO: अक्षय तृतीयेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2019 01:44 PM IST

ताज्या बातम्या