व्यवसायाची बेस्ट IDEA, शुल्लक गोष्टींमध्ये गुंतवणूक करून रोज कमवा 4 हजार रुपये

व्यवसायाची बेस्ट IDEA, शुल्लक गोष्टींमध्ये गुंतवणूक करून रोज कमवा 4 हजार रुपये

Banana Chips, Business - कमी गुंतवणुकीत व्यवसाय करण्याची चांगली संधी आहे. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 24 जुलै : तुम्हाला नवा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाची माहिती देतोय, ज्यात तुमची चांगली कमाई होईल. हा व्यवसाय आहे केळ्याच्या चिप्सचा. केळ्याचे चिप्स तब्येतीला चांगले असतात. उपवासालाही ते खाल्ले जातात. शिवाय ब्रँडेड कंपन्या केळ्याचे चिप्स फारशा बनवत नाहीत. त्यामुळे या व्यवसायाला चांगली संधी आहे.

केळ्याच्या चिप्स बनवण्यासाठी हे सामान महत्त्वाचं

केळ्याच्या चिप्स बनवण्यासाठी विविध मशीन्सची गरज लागते. कच्चा माल म्हणून कच्ची केळी, मीठ, खाण्याचं तेल आणि इतर मसाले लागतील. काही महत्त्वाच्या मशीन्स पुढीलप्रमाणे-

1. केळी धुण्यासाठी टँक आणि केळी सोलण्याचं मशीन

2. केळ्याचे पातळ तुकडे कापण्याचं मशीन

3. केळ्याचे तुकडे तळण्याचं मशीन

4. मसाले मिसळण्याचं मशीन

5. पाउच प्रींटिंग मशीन

6. प्रयोगशाळेतली उपकरणं

इतर बातम्या - पाकड्यांचं डोकं फिरलंय, म्हणे शाहिद आफ्रिदीला PM करा!

50 किलो चिप्स बनवण्याचा खर्च

50 किलो चिप्स बनवण्यासाठी कमीत कमी 120 किलो कच्च्या केळ्यांची गरज आहे. 120 किलो कच्ची केळी तुम्हाला जवळजवळ एक हजार रुपयांना मिळतील. याबरोबर 12 ते 15 लीटर तेलाची गरज लागते. 15 लीटर तेल 70 रुपयांच्या हिशेबानं 1050 रुपयांना पडेल. चिप्स फ्रायर मशीनला एक तासात 10 ते 11 लीटर डिझेल लागतं. 1 लीटर डिझेल 80 रुपयांच्या हिशेबानं 11 लीटर लागलं तर 900 रुपयांना पडेल. मीठ आणि मसाले जास्तीत जास्त 150 रुपयांना पडतील. मग तुमचे 3200 रुपयांमध्ये 50 किलो चिप्स तयार होतील. म्हणजे एक किलोच्या चिप्सचं पाकीट 70 रुपयांना पडेल. तुम्ही  ऑनलाइन किंवा किराणा दुकानात ते पाकीट 90 ते 100 रुपयांना विकू शकाल.

इतर बातम्या - उदयनराजे म्हणाले, राष्ट्रवादीची माझा बँड वाजवण्याची तयारी पण...

अशा प्रकारे होईल फायदा

या व्यवसायात फायदाच फायदा आहे. केळ्यांच्या चिप्सला जास्त मागणी आहे. तुम्ही 1 किलोवर 10 रुपयांचा फायदा होईल, असा विचार केलात तर दिवसभरात 4 हजार रुपये सहज कमवू शकता. तुम्ही महिन्यातले 25 दिवस जरी काम केलंत तरी महिन्याला 1 लाख रुपये सहज कमवू शकाल.

इतर बातम्या - VIDEO: '...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही कलम 370ला विरोध होता'

इथे मिळतील मशीन्स

केळ्याच्या व्यवसायासाठी लागणारी मशीन्स https://www.indiamart.com/ किंवा https://india.alibaba.com/index.html या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. हे मशीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4 हजार ते 5 हजार चौरस फूट जागेची गरज लागेल. या मशीनची किंमत 28 हजारापासून 50 हजारापर्यंत आहे.

VIDEO: भाजपच्या मंचावर उदयनराजेंनी पहिल्यांदा उडवली कॉलर आणि म्हणाले...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2019 12:54 PM IST

ताज्या बातम्या