Home /News /money /

नोकरी करतच अगदी कमी भांडवलात सुरू करा हे व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई

नोकरी करतच अगदी कमी भांडवलात सुरू करा हे व्यवसाय; दरमहा होईल बक्कळ कमाई

आज आम्ही तुम्हाला अशा काही बिझनेस आयडियाबद्दल (Business idea) सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी खर्चात घरी बसून दरमहा खूप कमाई करू शकता.

नवी दिल्ली 15 नोव्हेंबर : नोकरीतून मिळणाऱ्या पगाराव्यतिरिक्त प्रत्येक महिन्याला अतिरिक्त उत्पन्न (Extra Income) मिळवण्याची गरज बहुतांश जणांना भासते. कमी खर्चात (How to Earn Money) व्यवसाय सुरू करणं शक्य आहे. यासाठी नोकरी सोडण्याचीही गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बिझनेस आयडियाबद्दल (Business idea) सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी खर्चात घरी बसून दरमहा खूप कमाई करू शकता. या व्यवसायाचं ऑनलाइन (Online Business) आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने मार्केटिंग करून चांगला नफा कमवू शकता. खडू बनवण्याचा व्यवसाय खडू बनवण्याच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी फार कमी भांडवल लागतं. फक्त 10,000 रुपयांमध्ये घरबसल्या हा व्यवसाय सुरू करू शकता. खडू बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. पांढऱ्या खडूंसोबतच रंगीत खडूही बनवता येतात. खडू मुख्यतः प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (Plaster of Paris) बनवले जातात. ही पांढऱ्या रंगाची पावडर असते. ही एक प्रकारची माती आहे, जी जिप्सम (Gypsum) दगडापासून तयार केली जाते. वर्षभरात 'हा' शेअर 16 टक्के वाढणार, MOTILAL OSWAL चा अंदाज; तुमच्याकडे आहे का? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता बहुतांश राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयं सुरू झाली आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही विविध कॉलेजेस आणि शाळांशी संपर्क साधून त्यांना खडूंचा पुरवठा केल्यास तुम्हाला दरमहा मोठी कमाई करता येऊ शकेल. बाजारात खडूच्या एका बॉक्सची किंमत 10 रुपयांपासून 600 रुपयांपर्यंत आहे. ही किंमत खडूंच्या क्वालिटीवर ठरवण्यात येते. त्यामुळे क्वालिटीच्या आधारावर तुम्ही तुमच्याकडच्या खडूंची किंमत निश्चित करू शकता आणि दरमहा मोठी कमाई करू शकता. लिफाफे तयार करण्याचा व्यवसाय लिफाफे बनवण्याचा व्यवसाय अतिशय सोपा आणि स्वस्त आहे. लिफाफे पॅकेजिंगसाठी वापरले जातात. ते कागद किंवा कार्डबोर्डपासून बनवले जातात. त्यांना वर्षभर मागणी असते. तुम्हीही तुमच्या घरातून हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय 10,000 ते 30,000 रुपयांच्या भांडवलामध्ये सुरू करता येऊ शकेल. तुम्हाला लिफाफे बनवण्याचा व्यवसाय मोठ्या स्वरूपात करायचा असेल, तर लिफाफे बनवण्याचे मशीन बसवावे लागेल. यासाठी तुम्हाला 5,00,000 रुपयांपर्यंत खर्च करावा लागेल. फक्त 53 हजार रुपयांमध्ये सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा 35 लाख रुपये! तुम्ही तयार केलेल्या लिफाफ्यांचा थेट जवळच्या बाजारपेठेत पुरवठा करू शकता. इतकंच नाही तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर लिफाफे बनवत असाल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या शहरांनाही त्याचा पुरवठा करू शकता. गिफ्ट पॅकिंगपासून भाजीपाला ठेवण्यापर्यंत आता कागदी पाकिटांचा वापर केला जात आहे. आजकाल बहुतांश दुकानदार पॉलिथिनऐवजी कागदी पाकिटांना प्राधान्य देत आहेत. त्यामळे या व्यवसायात तुम्हाला दरमहा चांगले पैसे कमावणं शक्य आहे.
First published:

Tags: Small investment business, Start business

पुढील बातम्या