मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या Star Health चा IPO आज ओपन होणार

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या Star Health चा IPO आज ओपन होणार

स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सच्या (Star Health and Allied Insurance) IPO ची किंमत 870 ते 900 रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनी फ्रेश इश्यूमधून उभारलेल्या पैशाचा वापर कंपनीचा कॅपिलटल बेस वाढवण्यासाठी करेल.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 30 नोव्हेंबर : दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची गुंतवणूक असलेल्या स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स  (Star Health and Allied Insurance) कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) मंगळवार, 30 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून ओपन होत आहे. सोमवारी कंपनीने सुरुवातीच्या शेअर विक्रीपूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 3217.13 कोटी रुपये उभे केले आहेत. 2021 मधील हा तिसरा सर्वात मोठा पब्लिक इश्यू आहे.

कंपनीने आपल्या बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे की त्यांनी अँकर गुंतवणूकदारांना 900 रुपये प्रति शेअर या किमतीने 3,57,45,901 इक्विटी शेअर्सचे वाटप अंतिम केले आहे. तुम्हालाही यात पैसे गुंतवायचे असतील तर त्याबद्दल माहिती घेऊया.

IPO 3 दिवसांसाठी उघडेल

हा IPO 30 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 2 डिसेंबर 2021 रोजी बंद होईल. अप्पर प्राइस बँडनुसार कंपनी 7249 कोटी रुपये उभारणार आहे. या IPO अंतर्गत 2000 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि 5249 कोटी रुपयांची इक्विटी ऑफर-फॉर-सेल (OFS) अंतर्गत विक्रीसाठी ठेवली जाईल.

RD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय; मग तुम्ही हे वाचायलाच हवं

निश्चित प्राईज बँड काय आहे?

स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सच्या IPO ची किंमत 870 ते 900 रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनी फ्रेश इश्यूमधून उभारलेल्या पैशाचा वापर कंपनीचा कॅपिलटल बेस वाढवण्यासाठी करेल.

किमान 14400 रुपये गुंतवणूक करावी लागेल

स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या IPO साठी बोली लावली जाऊ शकते. एका लॉटमध्ये कंपनीचे 16 शेअर्स असतील. अशाप्रकारे, गुंतवणुकदाराला 14,400 रुपयांच्या आसपास गुंतवणूक करावी लागेल.

10 नोव्हेंबरला होऊ शकते लिस्टिंग

स्टार हेल्थ इन्शुरन्सचे शेअर्स 10 नोव्हेंबरला शेअर बाजारात लिस्ट केले जाऊ शकतात. कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही ठिकाणी लिस्ट केले जातील.

देशातल्या प्रमुख बॅंका रिकरिंग डिपॉझिटवर किती देतात व्याजदर; जाणून घ्या माहिती

कंपनीबद्दल जाणून घ्या

स्टार हेल्थ कंपनी 2006 मध्ये सुरू झाली होती. ही देशातील सर्वात मोठ्या खाजगी विमा कंपन्यांपैकी एक आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये त्याचा बाजार हिस्सा 15.8 टक्के इतका होता. कंपनीचा फोकस रिटेल हेल्थ मार्केट सेगमेंटवर आहे. हे रिटे आरोग्य, ग्रुप हेल्थ, पर्सनल अॅक्सिडंट आणि ओवरसीज ट्र्रॅव्हल सेगमेंटमध्ये विमा विकते. प्रस्तावित IPO नंतर, स्टार हेल्थ ही बाजारातील चौथी सर्वात मोठी विमा विमा कंपनी बनेल. यात HDFC लाइफ इन्शुरन्स, ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स आणि ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स आहे.

First published:

Tags: Money, Share market