तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे? मग मिळू शकते सरकारी नोकरी

योग्य उमेदवार या नोकरीसाठी 22 जूनपर्यंत अर्ज करू शकतात.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 12:24 PM IST

तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे? मग मिळू शकते सरकारी नोकरी

मुंबई, 25 मे : Staff Car Driver vacancy: ऑफिस ऑफ द कॉम्पट्रोलर आणि ऑडिटर जनरल ऑफ इंडियानं स्टाफ कार ड्रायव्हरसाठी व्हेकन्सी काढल्यात. योग्य उमेदवार या नोकरीसाठी 22 जूनपर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जूनच आहे.

अरुणाचल प्रदेश, आसम, हिमाचल प्रदेश , जम्मू आणि कश्मीर, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नगालँड, सिक्किम, त्रिपुरा, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप बेटं इथले रहिवासी मात्र 7 जुलै 2019पर्यंत अर्ज करू शकतात.

10 हजारांची गुंतवणूक, महिन्याला 30 हजाराची कमाई, पटापट जाणून घ्या हा व्यवसाय

स्टाफ कार ड्रायव्हर पोस्टसाठी 4 व्हेकन्सीज आहेत. त्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मोटर कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. मोटर मेकॅनिझमची माहिती असायला हवी. कार चालवण्याचा कमीत कमी 3 वर्षांचा अनुभव असावा.

निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर राहुल गांधींच्या ऑफिसमध्ये राजीनामा पत्रांचा पाऊस

Loading...

उमेदवार 10वी उत्तीर्ण हवा. तीन वर्षाचा Home Guard/Civil Volunteer अनुभव हवा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 27 वर्षाच्या मध्ये असावं. आरक्षणाच्या नियमांनुसार उमेदवाराला वयात सूट मिळेल. लेव्हल 2साठी महिन्याला पगार 19,900 पासून 63,200 रुपयापर्यंत दर महिना.

काँग्रेसच्या 3 नेत्यांनी सांगितलं पक्षाच्या मानहानीकारक पराभवाचं खरं कारण

कसा कराल अर्ज?

योग्य उमेदवार आपला अर्ज या पत्त्यावर पाठवू शकतात. पत्ता- द डायरेक्टर जनरल (Personnel), ऑफिस ऑफ द कॉम्पट्रोलर आणि ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, 9-दीनदयाळ उपाध्या मार्ग, नवी दिल्ली-110124.  तुमचा अर्ज तुम्ही दिलेल्या तारखेच्या आतच करा.


VIDEO : महिलेनं बाळासह लोकलखाली मारली उडी; आश्चर्यकारकरित्या बचावलं बाळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 12:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...