सशस्त्र सीमा दलात 150 जागांवर व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

सशस्त्र सीमा दलात 150 जागांवर व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

SSB Recruitment 2019 - सशस्त्र सीमा दलात नोकरीची मोठी संधी आहे

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : सशस्त्र सीमा दल ( SSB ) इथे नोकरीची चांगली संधी आहे. स्पोर्ट कोटामध्ये स्त्री-पुरुष काॅन्स्टेबलसाठी व्हेकन्सी आहे. ग्रुप C मध्ये ही व्हेकन्सी आहे. हे नोटिफिकेशन सशस्त्र सीमा दलाच्या ऑफिशियल वेबसाइट ssbrectt.gov.in इथे पाहता येईल. ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी  direct link वर जावं. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 13 जुलै 2019. या पदासाठी 150 जागा भरणार आहेत.

उमेदवारांनी खालीलप्रमाणे अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी

स्टेप 1 - ssbrectt.gov.in या वेबसाइटवर क्लिक करा.

स्टेप 2 - नंतर SB Recruitment 2019 वर क्लिक करा. इथे स्पोर्ट कोटामध्ये स्त्री-पुरुष काॅन्स्टेबलसाठी व्हेकन्सी आहे.

फक्त इंटरव्ह्यू घेऊन रेल्वे देतेय नोकरी, 'इथे' करा अर्ज

स्टेप 3 - स्पोर्ट कोटामधली SSB Recruitment 2019 वर क्लिक करा.

स्टेप 4 - इथे तुम्ही सगळे तुमचे डिटेल्स टाका आणि योग्य निकष नीट वाचा.

स्टेप 5 - सबमिटवर क्लिक करा.

'या' सरकारी बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट, आता वाचतील तुमचे पैसे

स्टेप 6 - तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड लक्षात ठेवा.

सशस्त्र सीमा बलाची स्थापना स्पेशल सर्विस ब्युरो म्हणून मे 1963ला झाली. 1962ला झालेल्या चीन युद्धानंतर सशस्त्र सीमा बलाची स्थापना झाली. जानेवारी 2001पासून हे बल गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येतं. इथे नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे.

एका रात्रीत झाले पैसे दुप्पट, शेअर बाजारातल्या महागुरूच्या या काही टिप्स

लष्कर, नौदल आणि वायू दल या तीनही दलांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता जाणवतेय. हा मुद्दा राज्यसभेत एका प्रश्नोत्तरादरम्यान संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी मांडला. राज्यमंत्र्यांनी सांगितलं, तीनही दलांमधली 78,291 पदं रिकामी आहेत. यात 9427 पदं अधिकारी रँकमधली आहेत. तर ज्युनियर लेव्हलची 68,864 पदं  रिकामी आहेत. दुसऱ्या बाजूला अधिकारी नोकरी सोडण्याचा सिलसिला सुरूच आहे.

याबाबत असं सांगण्यात आलंय की तीनही दलांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरुणांना जागरुक केलं जातंय. जाॅब फेअरमध्ये तरुणांना माहिती दिली जाते. वेळोवेळी कँपेन चालवलं जातं. इतर उपायही केले जातात. म्हणजे प्रमोशनमध्ये सुधारणा, आकर्षक वेतन पॅकेज, धोकादायक आव्हान पेललं तर बक्षीसही दिलं जातं, कुटुंबासाठी घर आणि इतर सुविधा अशा गोष्टींचा समावेश केला जातो.

VIDEO : हाफिज सईद अटक प्रकरणावर उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2019 04:41 PM IST

ताज्या बातम्या