मराठी बातम्या /बातम्या /मनी /अवघ्या 987 रुपयांत मुंबईहून लेह आणि औरंगाबादला करा प्रवास, ही एअरलाइन देतेय खास ऑफर

अवघ्या 987 रुपयांत मुंबईहून लेह आणि औरंगाबादला करा प्रवास, ही एअरलाइन देतेय खास ऑफर

12 ते 15 मार्चपर्यंत एक विशेष सेल स्पाईसजेट एअरलाइन्सने सुरू केला आहे. त्याअंतर्गत डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी खास ऑफर देण्यात आली आहे.

12 ते 15 मार्चपर्यंत एक विशेष सेल स्पाईसजेट एअरलाइन्सने सुरू केला आहे. त्याअंतर्गत डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी खास ऑफर देण्यात आली आहे.

12 ते 15 मार्चपर्यंत एक विशेष सेल स्पाईसजेट एअरलाइन्सने सुरू केला आहे. त्याअंतर्गत डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी खास ऑफर देण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 13 मार्च : ‘कोरोना व्हायरस’ च्या भीतीमुळे वाहतूक व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करणं नागरिकांकडून टाळण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध एअरलाइन्सकडून ऑफर्स देण्यात येत आहेत. स्पाइसजेट (Spicejet) या एअरलाइन्सने देखील मुंबईपासून काही नवीन फ्लाइट्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 12 ते 15 मार्चपर्यंत एक विशेष सेल देखील स्पाईसजेटने सुरू केला आहे. विशेषत: कमी अंतराच्या फ्लाइट्समुळे मुंबई ते औरंगाबाद प्रवास अवघ्या 65 मिनीटांत आणि मुंबई ते लेह हा प्रवास 3 तासात करणं शक्य झालं आहे. त्याचप्रमाणे मुंबई ते चेन्नई, मुंबई ते राजकोट हा प्रवास देखील काही तासांमध्ये होणार आहे.

(हे वाचा-फोन खरेदी करताय तर जरा थांबा! कमी किंमतीत विकत घेऊ शकता नवा मोबाइल)

काय आहे ऑफर?

‘स्पाइसजेट’ ने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 12 ते 15 मार्चदरम्यान नवीन सेल सुरू केला आहे. ज्याअंतर्गत डोमेस्टिक फ्लाइट्स 987 रुपयांत तर आंतरराष्ट्रील फ्लाइट्स 3699 रुपयांत उपलब्ध होणार आहेत. ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला 15 मार्चपर्यंत फ्लाइट बुकिंग करणं आवश्यक आहे.

(हे वाचा- केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढणार, सरकारचा मोठा निर्णय)

28 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही या ऑफर अंतर्गत प्रवास करू शकता. त्याचप्रमाणे स्टँडर्ड चार्टड बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड युजर्सना आणखी काही फायदे मिळणार आहेत. प्रोमोकोड SCB1000 वापरल्यानंतर अतिरिक्त 1000 रुपयांची सूट मिळणार आहे. याशिवाय खाद्यपदार्थांशी संबधित ऑफर्सही उबलब्ध करता येणार आहेत.  स्पाइसजेटच्या अॅपवर किंवा www.spicejet.com यासंदर्भातील अधिक माहिती तुम्ही मिळवू शकता.

First published:
top videos

    Tags: Spicejet, SpiceJet flight